घरमहाराष्ट्रप्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर सिडकोची कारवाई

प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर सिडकोची कारवाई

Subscribe

उरण-द्रोणागिरी नोड परिसरातील सिडकोच्या जागेवर उभारण्यात आलेल्या बांधकामांवर अतिक्रमण विभागाने पोलीस फौजफाट्यासह मंगळवारी कारवाईचा बडगा उचलला. सिडकोच्या या कारवाईमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

नवी मुंबई, पनवेल तालुक्याप्रमाणे उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, धुतुम, पागोटे, नवघर, बोकडवीरा, चाणजे, नागाव, म्हातवली, फुंडे आदींसह इतर ग्रामपंचायत हद्दीच्या गावांतील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी शासनाने सिडकोच्या माध्यमातून संपादित केल्या होत्या. त्यावेळी रहिवाशांना, प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा, वाढीव गावठाण विस्तार, नोकरी, साडेबारा टक्के भूखंड यासह इतर सुविधा देण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु त्या आश्वासनांची पूर्तता न करता उलट संपादित करण्यात आलेले भूखंड जैसे थे स्थितीत पडिक ठेवण्याचे काम २७ वर्षे केले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी टपर्‍या, व्यवसायासाठी दुकानांचे बांधकाम तेथे केले.

- Advertisement -

सिडकोच्या अतिक्रमण विभागाने सदर बांधकामे अनधिकृत ठरवून त्या बांधकामांना नोटिसा बजावून ते पाडण्याचे काम केले. या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टपरीधारक, प्रकल्पग्रस्त एकवटले होते. यावेळी पोलिसांनी टपरीधारक प्रकल्पग्रस्तांना शांतता पाळण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना जितेंद्र पाटील, एम. जे. पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील या प्रकल्पग्रस्तांनी सिडकोने स्वतःच्या फायद्यासाठी शेतजमिनी संपादित करून प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबियांना, त्यांच्या वारसांना वार्‍यावर सोडण्याचे काम केल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -