घरदेश-विदेशधक्कादायक : क्रिकेटच्या मैदानात खेळताना खाली कोसळला; 20 वर्षीय मुलाचा हार्ट...

धक्कादायक : क्रिकेटच्या मैदानात खेळताना खाली कोसळला; 20 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून हार्ट अटॅकचे (Heart attack) प्रमाण वाढले आहे. यामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बहुतांश तरुणांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू होत असल्यामुळे चिंतेची बाब ठरत आहे. गुजरातमधील (Gujrat) अरावलीमध्ये एका 20 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. क्रिकेट (Cricket) खेळत असताना मृत्यू झाला असल्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. (Shocking Fell down while playing in a cricket field 20 year old boy dies of heart attack)

हेही वाचा – आपच्या ‘झाडू’ला आता काॅंग्रेसचा ‘हात’; केंद्र सरकारच्या अध्यादेशाला दोन्ही पक्षांचा विरोध

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अरावलीतील मोडासा येथील दीप परिसरात गोवर्धन सोसायटीच्या तीर्थ अपार्टमेंटमध्ये एक कुटुंब राहत होतं. या कुटुंबातील 20 वर्षांचा पर्व सोनी मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. यावेळी तो अचानक खाली कोसळला आणि त्याला हार्ट अटॅकमुळे आपले प्राण गमवावे लागले. इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या पर्व सोनीच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सुरेंद्र नगर येथील पाटडी येथे शहर भाजपाचे उपाध्यक्ष व नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजूभाई ठाकोर यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. मित्रांशी बोलून राजूभाई ठाकोर रात्री उशिरा घरी पोहोचले. यावेळी त्यांच्या हातात वेदना सुरू झाल्यामुळे ते औषध घेण्यासाठी बाईकवरून सरकारी रुग्णालयात गेले. पण धक्कादायक बाब अशी की, रुग्णालयाच्या बाहेरच त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – पावसाळी अधिवेशनादरम्यान अजितदादांचा दिल्ली दौरा; पंतप्रधान मोदींची ‘या’ प्रश्नावर घेणार भेट

तेलंगनाच्या नांदेडमध्येही एका तरुणाचा डान्स करता करता हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. त्याचे वय अवघे 19 वर्ष होते. तेलंगनातील तरुण वयात हार्ट अटॅकची ही चौथी घटना होती. याआधी 22 फेब्रुवारीला जिम वर्कआऊट दरम्यान एका पोलीस कॉस्टेबलचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. हैदराबादमध्ये एका लग्न समारंभात नवरदेवाला हळद लावणारा एक व्यक्ती अचानक कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान गेल्या काही वर्षापासून देशात हार्ट अटॅकच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. विशेष म्हणजे 21 ते 30 वयोगटातील तरूणांचे हार्ट अटॅकने मृत्यू होत असल्यामुळे चिंतेची बाब ठरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -