घरदेश-विदेशसोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्षपदी निवड

सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्षपदी निवड

Subscribe

काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक शनिवारी संध्याकाळी काँग्रेसच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी हंगामी पक्षाध्यक्ष असतील, असे निश्चित करण्यात आले आहे. बैठकीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांचेच नाव अध्यक्ष पदासाठी योग्य असल्याचे म्हटले. मात्र राहुल गांधी यांनी नकार दिल्यामुळे बैठकीत सोनिया गांधी यांच्या नावावर हंगामी पक्षाध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारुन आपल्या काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा त्यांनी २५ मे रोजी काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत दिला होता. मात्र अडीच महिने झाल्यानंतर अजूनही अध्यक्ष पदासाठी कोणाचीही निवड करण्यात आली नव्हती. दरम्यान या दोन महिन्यात काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आली. मात्र, कोणाच्याही नावावर अध्यापही शिक्कामोर्तब झाले नव्हते. अखेर अध्यक्ष पदावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी संध्याकाळी काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते हजर होते. याशिवाय अध्यक्ष पदावरून शनिवारी सकाळी अकरा वाजता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, ए. के. एन्टोनी, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम आणि अहमद पटेल यांच्यात काँग्रेसच्या मुख्यालयात बैठक पार पडली होती. त्यानंतर संध्याकाळी देशमरातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा झाली. या बैठकीत राहुल गांधीच अध्यक्ष पदी योग्य असल्याचे काँग्रेस कार्यकारिणीच्या प्रमुख नेत्यांनी म्हटले. मात्र राहुल गांधींनी नकार दिल्यामुळे सोनिया गांधी यांच्यावर तात्पुरता अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -