घरमहाराष्ट्रनाशिकमेळा बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

मेळा बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

Subscribe

अ‍ॅम्पीथिएटरच्या कामाला लागणार नऊ महिने

एअरपोर्टच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेले, प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देणार आणि एकाचवेळी स्थानकातून 20 बसगाड्या सुटण्याची व्यवस्था असलेले मेळाबसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर प्रवाशांना मनोरंजनाचे साधन असलेले अ‍ॅम्पीथिएटरचे काम नऊ महिन्यात पूर्ण होणार आहे.

दहा प्लॉटफॉर्म असलेल्या या अत्याधुनिक बसस्थानकांचे काम गत दोन वर्षापासून सुरू आहे. ते काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. एसटी महामंडळाकडून या बसस्थानकांचे लोकार्पण लवकर लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. एका प्लॉटफॉर्मवर दोन बस उभ्या राहतील, अशी मोकळी जागा या स्थानकात आहे. तसेच बाहेरून येणार्‍या गाड्यांना जिल्हा बँकेच्या जुन्या मुख्यालयासमोरील असलेल्या मार्गावरून प्रवेश असणार आहे. तर बाहेर पडण्यासाठी ठक्करबाजार मध्यवर्ती बसस्थानकाचा सध्याचा मार्ग उपयोगात आणला जाणार आहे. तर प्रवाशांसाठी शरणपूर मार्गाकडील पदमा हॉटेलच्या लगत असलेल्या प्रवेशद्वाराचा उपयोग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बालसुधारगृहालगतच्या भागातूनही नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मार्ग असणार आहे.

- Advertisement -

सध्या बसस्थानकाचे फिनिसिंग काम सुरू आहे. त्यात दरवाजे, खिडक्या, प्रवाशांना बसण्याचे बँच, जिने आदींना ग्रेनाईट टाईल्स बसविले जात आहे. त्याचबरोबर खिडक्यांच्या जाळ्या, फ्लॉरिंग टाईल, प्लास्टर, वायरिंग काम करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्राऊंड लेव्हल करण्यात येत आहे. येथे पूर्वी असलेल्या मंदिर नव्या जागेत हलवून त्याचा जिर्णोद्धार करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिसरातील वृक्षांची तोड करण्यासाठी मनपाची परवानगी मिळवण्यासाठी प्रक्रियाही न्यायालयात सुरू आहे.

हे असणार बसपोर्टमध्ये

  •   पोलिस चौकी
  • स्टेशन मॅनेजर केबीन
  • ऑफीसर रेस्टरूम
  • गेस्ट रूम
  • इलेक्ट्रेशियन कक्ष
  • चालक-वाहक विश्रांतीगृह

पूर्णत्वावर भर

बसस्थानक लवकर जनतेच्या सेवेत यावे, यासाठी प्रथम प्लॉटफॉर्मच्या कामाला पूर्णत्व देण्यात आलेले आहे. दूसर्‍या टप्प्यात बसस्थानकाच्या लगत शरणपूररोडच्या बाजूला ज अ‍ॅम्पीथिएटर उभारण्यात येत आहे, त्याचे काम सध्या सूरू आहे. हे काम बसस्थानक सुरू झाल्यावरही पूर्ण करण्यात येणार आहे. पण, प्रवाशांची सोय व्हावी, म्हणून बसस्थानकांच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे, असे एसटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

आमदार फरांदे यांचा पाठपुरावा

मेळा बसस्थानकांची उभारणी करण्यासाठी आ.देवयानी फरांदे यांनी प्रयत्न केले होते. या प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर आ.फरांदे यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची ओळख परेड करून घेत, हे काम वेळेत पूर्ण कसे होईल, याचा पाठपुरावा आजपर्यंत कायम ठेवलेला आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील हे बसस्थानक लवकरच एसटीकडून लोकार्पण होणार आहे, असे एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -