घरदेश-विदेशभिवंडीत इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या गोदामाला भीषण आग

भिवंडीत इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या गोदामाला भीषण आग

Subscribe

शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील ग्लोबल कॉम्प्लेक्समधील एन-बिल्डिंगमध्ये असलेल्या जपानच्या आंतरराष्ट्रीय हिताची इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या टोलेजंग गोदामाला भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधींचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले.

भिवंडी तालुक्याच्या गोदाम पट्ट्यात गेल्या पंधरा दिवसांपासून आगी लागण्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील ग्लोबल कॉम्प्लेक्समधील एन-बिल्डिंगमध्ये असलेल्या जपानच्या आंतरराष्ट्रीय हिताची इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या टोलेजंग गोदामाला भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधींचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. गोदाम बंद असल्याने सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या गोदामात फ्रिज, एसी, एलईडी टीव्ही, कॅमेरा, मोटार पंप तसेच विविध मोटारींचे स्पेअर पार्ट्स आदींसह विविध इलेक्ट्रॉनिक या गोदामात साठवण्यात आले होते.

आगीमागील कारण अध्यापही अस्पष्ट

या आगीची खबर मिळताच भिवंडी अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी दत्ता साळवी यांनी जवानांसह घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र आगीचे रौद्ररूप पाहता कल्याण, ठाणे, उल्हासनगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल जवानांचे अथक प्रयत्न सुरु आहेत. या आगीचे कारण अस्पष्ट असून ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अध्याप मिळालेली नाही. गोदाम पट्ट्यामध्ये सतत लागणाऱ्या आगीच्या धुरात संशयाचे ढग कायमच जमा होत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या सतत लागणाऱ्या आगी कोट्यवधींचे इंशुरन्स मिळवण्यासाठी लावल्या जात असाव्यात असाही कयास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -