घरदेश-विदेशसोन सूद याचे Return Gift; मजुरांसाठी ३ लाख नोकऱ्यांची केली घोषणा

सोन सूद याचे Return Gift; मजुरांसाठी ३ लाख नोकऱ्यांची केली घोषणा

Subscribe

देश लॉकडाऊन असताना परप्रांतियांना आपापल्या घरी जाण्यासाठी ज्या बॉलीवूड अभिनेत्याने मोलाचे कार्य केले त्यानेच त्यांच्या रोजरोटीचाही बंदोबस्त केला आहे. आज अभिनेता सोनू सूद याचा वाढदिवस असून त्याने आजच्या दिवशीच प्रवाशांकरता ३ लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. सोन सूद याने ट्विट करत ही माहिती दिली आहे. सोनू सूद ३० जुलै रोजी त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत असून त्याने प्रवासी मजुरांच्या नोकऱ्यांची घोषणा आजच्या दिवशी केली आहे.

- Advertisement -

काय म्हटले आहे सोनूने

सोनू सूद याने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या प्रवासी बांधवांसाठी http://PravasiRojgar.com या माध्यमातून ३ लाख नोकऱ्यांचा करार केला आहे. हे सर्व चांगले वेतन PF, ESI आणि इतर सुविधा उपलब्ध करून देतात. याकरता मी AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सोनूने हे रोजगार उपलब्ध करताना काही कंपन्यांशी करार केले आहेत. तसेच पुरामुळे आसाम आणि बिहार राज्यात लाखो लोकांचे नुकसान झाले असल्यामुळे काहींना आपल्या नोकऱ्याही गमवाव्या लागल्या होत्या. आता या सर्वांच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे सरसावला आहे.

हेही वाचा –

Unlock ३ मध्ये तुम्ही ‘या’ गोष्टी करू शकणार नाहीत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -