घरदेश-विदेशचिंताजनक! कोरोनाला हरवलेल्या ८०% रूग्णांना हृदयविकाराचा धोका - New Research

चिंताजनक! कोरोनाला हरवलेल्या ८०% रूग्णांना हृदयविकाराचा धोका – New Research

Subscribe

मेंदू आणि किडनीवरही होतोय कोरोना व्हायरसचा परिणाम

जीवघेणा कोरोना व्हायरस चीनमधील वुहान शहरातून जगभर पसरण्यास सुरूवात झाली. त्यानंतर संपुर्ण जगभर या व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आणि सगळ्यांचीच चिंता वाढवली. या महामारीला आळा घालण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ त्यावर लस शोधण्यात व्यस्त आहे. तर शास्त्रज्ञांसह तज्ज्ञ सध्या या आजाराबाबत विविध माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी नवनवीन संशोधन देखील करून त्याचे अध्ययन केले जात आहे. अशाच एका संशोधनातून असे समोर आले आहे की, कोरोनावर मात केलेल्या ८० % रुग्णांना हृदयाचा आजार होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संशोधन जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथे जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने (JAMA) केले आहे. याअंतर्गत, यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान, ४० ते ५० वर्षे वयोगटातील लोकांवर संशोधन करण्यात आले होते, जे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. या १०० जणांपैकी ६७ रूग्ण होते ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली होती आणि ते बरे झाले. तर, उर्वरित २३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णांची डॉक्टरांनी एमआरआय, रक्त चाचण्या आणि हार्ट टिशू बायोप्सीदेखील करण्यात आली होती.

- Advertisement -

संशोधनातून असे आले समोर

दरम्यान १०० पैकी ७८ रुग्णांना हृदयाच्या अनेक समस्या होत्या. यामध्ये काहींच्या हृदयाला सूज दिसून आली आहे, असे या संशोधनातून समोर आले आहे. हे अभ्यासाचे प्राथमिक निष्कर्ष असले तरी, हृदया संबंधित लक्षणं दिसत असून ती बराच काळ टिकून राहिली आहेत का? याचा अभ्यास सध्या शास्त्रज्ञ अजूनही करीत आहेत.

कोरोना एक ‘सिस्टीमिक रोग’ झालाय

कोरोना हा व्हायरस आता केवळ रूग्णाच्या फुफ्फुसांवर हल्ला करत नाही तर त्याचा मेंदू, किडनी आणि हृदयाचेही मोठे नुकसान पोहोचवतो, असे AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी यासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे ते असे म्हणाले की कोरोना आता ‘सिस्टीमिक रोग’ झाला आहे.


कोरोनावर नवं संशोधन; ९ दिवसानंतर Positive रूग्णांकडून होणाऱ्या संसर्गाचा धोका नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -