घरदेश-विदेशSri Krishna Janmabhoomi Case : आधी अलाहाबाद उच्च न्यायालयात जा, ईदगाह समितीची...

Sri Krishna Janmabhoomi Case : आधी अलाहाबाद उच्च न्यायालयात जा, ईदगाह समितीची याचिका फेटाळली

Subscribe

नवी दिल्ली : श्रीकृष्ण जन्मभूमीशी संबंधित याचिकांच्या एकत्र सुनावणीस विरोध करणाऱ्या ईदगाह समितीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाने समितीला आधी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

मथुरेतील वादग्रस्त शाही ईदगाह आणि श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१९ मार्च) रोजी शाही ईदगाह समितीची याचिका फेटाळत समितीला आधी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती मागितली होती. उच्च न्यायालयाने या विषयाशी संबंधित सर्व याचिकांवर एकाच वेळी सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा – CAA : CAA ला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शंकानिरसनासाठी केंद्राला दिला वेळ

ईदगाह समितीने म्हटले की, एकत्रितपणे दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांचे दावे परस्परविरोधी आहेत. याबाबतचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचा दावा झाला असता, न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य केला नाही. तसेच, अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणावर पुनर्विलोकन याचिकाही दाखल करण्यात आली आहे, या प्रकरणी उच्च न्यायालयात आधी निर्णय घ्यावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

ईदगाह समितीच्या याचिकेवर या प्रकरणाची पुढील सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तसेच, उच्च न्यायालयात निर्णय झाल्यावरच सर्वोच्च न्यायालयात ईदगाह समिती या प्रकरणी जावे लागणार आहे. श्रीकृष्णजन्मभूमी खटल्यात हिंदू पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे मागणी केली होती की या प्रकरणी दाखल १५ स्वतंत्र याचिका एकत्र विलीन कराव्यात आणि त्यानंतर सुनावणी घेण्यात यावी. यामुळे खटल्याच्या सुनावणीला गती मिळेल आणि पक्षकारांनाही सोय होईल, असे हिंदू पक्षाने म्हटले आहे.

हेही वाचा – NCP : शरद पवारांच्या नव्या चिन्ह आणि पक्षाच्या नावाला SCची मान्यता; निवडणूक आयोगाला दिले निर्देश

मथुरा जिल्हा न्यायालयाकडून सर्व प्रकरणे उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याविरुद्ध मशिदीच्या बाजूची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मशीद समितीच्या त्या याचिकेवर एप्रिलमध्ये सुनावणी होणार आहे. आजचे प्रकरण १८ पैकी १५ प्रकरणे एकत्रित करण्याच्या विरोधात होते. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप केलेला नाही. कोर्टात या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत मशीद समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगण्यात आले आहे.

हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने शाही इदगाह मशिदीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.” उच्च न्यायालयाने कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मस्जिद वादाशी संबंधित १५ प्रकरणे एकत्रित सुनावणीसाठी एकत्रित केली आहेत. “सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की तुम्ही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एकत्रीकरणाच्या आदेशाविरोधात आधीच फेरविचार याचिका दाखल केली आहे, त्यामुळे आधी फेरविचार याचिकेवर निर्णय घ्यावा आणि त्यानंतर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात येऊ शकता.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -