घरठाणेशिवसेनेचा लोकसभा जागा वाटपाचा तिढा सुटेल का?

शिवसेनेचा लोकसभा जागा वाटपाचा तिढा सुटेल का?

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जागा वाटपाची चर्चा

ठाणे । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आचार संहिता जाहीर झाल्यापासून सुरु झाली. यामध्ये लोकसभेच्या जागेवरून शिवसेनेमध्ये तिढा निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या जागा भाजपला हव्या असल्याची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे कि काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक मंगळवारी आयोजित होती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या खासदार मतदार संघ आढावा बैठकीत शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित होते.
यावेळी बैठकीनंतर राहुल शेवाळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेतृत्वाखाली शिवसेना खासदारांची मुख्यमंत्री यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मंगळवारी सकाळी 11 वाजता बैठक झाली, त्यामध्ये विद्यमान खासदारांचे जे मतदार संघ आहेत. त्या मतदारांची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली, त्या संदर्भात चर्चा देखील केली. लवकरच भाजपाचे वरिष्ठ पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करून एक, दोन दिवसात महायुतीच्या जागा वाटप संदर्भात निर्णय होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे.

महायुतीतील सर्व पक्षातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांना सूचना द्याव्यात, कि जोपर्यंत महायुतीचे उमेदवार घोषित होत नाहीत, महायुतीचा फॉर्मुला घोषित होत नाही तो पर्यंत कुठल्याही नेत्यांनी व्यक्तव्ये करू नये, जेणे करून वातावरण दूषित होणार नाही, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले. एनडीएच्या माध्यमातून महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे शेवाळे म्हणाले. या बैठकीत मतदार संघाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. पुढील एक,दोन दिवसातच महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते लोकसभेच्या उमेदवारी बाबतीत निर्णय घोषित करतील. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. महायुतीमध्ये सर्वांचा सन्मान राखला जात असून जागा वाटपाचा फॉर्मुला लवकरच जाहीर होईल, यामुळे कुठेही कटुता निर्माण होणार नाही, असे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -