घरदेश-विदेशमुझ्झफरपूर बालिका गृह प्रकरण : ब्रजेश ठाकूरला दिलासा नाही

मुझ्झफरपूर बालिका गृह प्रकरण : ब्रजेश ठाकूरला दिलासा नाही

Subscribe

मधूची सीबीआय चौकशी केल्यानंतर तिने अशा अधिकाऱ्यांची नावे सांगितली आहेत जी ब्रजेशला या प्रकरणातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होती. यात समाज कल्याण विभागदेखील असल्याचे तिने सांगितले आहे.

मुझ्झफरपूर बालिका गृहातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले. हे बालिकागृह चालवणारा ब्रजेश ठाकूर या प्रकरणात दोषी आढळला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती. ब्रजेश ठाकूरने माझ्यावरील आरोप खोटे असून मलाच मारहाण झाल्याचे म्हटले होते. त्यानुसार त्याने त्याचा तपासणी अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला होता. पण त्यात मारहाणीचे कोणतेही पुरावे सापडले नाही. शिवाय त्याने बालिका गृह न तोडण्याची मागणी याचिकेतून केली होती. ब्रजेश ठाकूर दोषी नसल्याचा कोणताही पुरावा न सापडल्याने सुप्रीम कोर्टाने ब्रजेशची याचिका फेटाळली आहे.

वाचा- मुझ्झफरपूर प्रकरण : सामाजिक न्याय मंत्री मंजू वर्मांचा राजीनामा

संपत्ती जप्तीचे दिले होते आदेश

३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारीने मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर, त्याची पत्नी आणि अन्य ६ लोकांच्या संपत्तीचे आदेश दिले होते. जे हे बालिकागृह चालवत होते ते सगळे सेवा संकल्प समितिचे आहेत. २९ नोव्हेंबर रोजी साईस्ता परवीन उर्फ मधू आणि अश्विनीकुमार यांना सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.

- Advertisement -
वाचा- शेल्टर होममधील मुले देशाची मुले नाहीत का?- सुप्रीम कोर्ट

ब्रजेश ठाकूरच्या मागे राजकीय नेते

मधूची सीबीआय चौकशी केल्यानंतर तिने अशा अधिकाऱ्यांची नावे सांगितली आहेत जी ब्रजेशला या प्रकरणातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होती. यात समाज कल्याण विभागदेखील असल्याचे तिने सांगितले आहे.या प्रकरणाशी संबधित समाजकल्याणमंत्री मंजू वर्माने देखील पदाचा राजीनामा दिला होता. नेते मंडळींशी चांगले असल्यामुळे ब्रजेश ठाकूर विरोधात कोणीही बोलायला तयार नाही शिवाय मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार लपवण्यासाठी देखी अनेकदा मुलींच्या आरोग्य तपासणीत बदल करण्यात येत असल्याचे देखील सीबीआयला मधूने  सांगितले आहे. हे सगळे पाहता मुख्य आरोपी ब्रजेशची याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे.

वाचा संपूर्ण प्रकरण- झोपेचे औषध देऊन चिमुरडयांवर केला जात होता ‘बलात्कार’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -