घरदेश-विदेशइंदिरा गांधी विमानतळावर बेवारस बॅगमध्ये आढळले आरडीएक्स

इंदिरा गांधी विमानतळावर बेवारस बॅगमध्ये आढळले आरडीएक्स

Subscribe

इंदिरा गांधी विमानतळावर एक बेवारस बॅग आढळून आली असून या बॅगमध्ये आरडीएक्स आढल्याचे समोर आले आहे.

राजधानी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर एक संशायास्पद बेवारस बॅग आढळून आली आहे. या बॅगमुळे विमानतळावर खळबळ उडाली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळाच्या टर्मिनल ३ वर एक संशयास्पद बॅग मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ती बॅग ताब्यात घेतली. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार; या संश्यास्पद बॅगचा तपास केल्यानंतर आरडीएक्स आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पिलर क्र. ४ च्या एन्ट्रीजवळ ही संशयास्पद बॅग आढळली. या बॅगेमध्ये आरडीएक्ससारखे स्फोटक आढळले आहे. दरम्यान, सीआयएसएफचे कॉन्स्टेबल व्ही. के. सिंह यांनी सर्वप्रथम ही बॅग पाहिली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे विमानतळावर घबराट उडाली होती. त्यानंतर टर्मिनल ३ च्या समोरील रस्ता बंद करण्यात आला असून लोकांना टर्मिनल ३ मधून बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली.

आरडीएक्स किंवा अन्य स्फोटक असल्याची माहिती मिळालेली नाही. विमानतळाबाहेर बेवारस बॅग मिळाली, तिला बॉम्बप्रूफ गाडीतून आणली. सध्या फोरेन्सिक टीम तपास करत आहेत. त्याची माहिती मिळायला २४ तास लागतील. – एम.ए. गणपती; सीआयएसएफचे अतिरिक्त महासंचालक

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेत हिंदी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -