घरमहाराष्ट्रपुन्हा विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ

पुन्हा विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ

Subscribe

सलग तिसऱ्या महिन्यात विनाअनुदानित घरगुती सिलिंडरमध्ये दरवाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडर घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सतत वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा गॅस कंपन्यांनी एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे गृहिणींना सिलिंडर घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या (१४.२ किलो) बाजार भावात ७६.५ रुपायांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडर (१९ किलो)च्या बाजार भावात ११९ रुपयांची वाढ केली आहे.

राजधानी दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी आता ६८१ रुपये प्रतिसिलिंडर मोजावे लागणार असून मुंबईत ६५१ रुपये प्रतिसिलिंडरची किंमत झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरसाठी दिल्लीत दुकानदारांना तब्बल १२०४ रुपये द्यावे लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यात याच सिलिंडरचे दर १०८५ रुपये होते. आता पाच किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

आजपासून हे वाढलेले दर लागू होणार आहेत. सलग तिसऱ्या महिन्यात हे दरवाढ झाले आहेत. ऑगस्टमध्ये हे विनाअनुदानीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ही ६११ रुपये होती. तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत १०९५ रुपये होती. आता हे सिलिंडर १९३ रुपयांनी वाढले आहेत.

सिलिंडर              किंमत
१४.२ किलो           ७१६
१९ किलो             १२८८
५ किलो              २६४.५०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -