घरदेश-विदेशआधी स्वतःचं बघा; नसीरुद्दीन शाहंचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर

आधी स्वतःचं बघा; नसीरुद्दीन शाहंचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर

Subscribe

हिंदी चित्रपटसृष्टीचे अनुभवी अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच वादात अडकले आहेत. या वादात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नसीरुद्दीन यांनी इम्रान खान यांना जसाशतसे उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. नसीरुद्दीन यांच्या वक्तव्याचा आधार घेत इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. “अल्पसंख्यांकाबरोबर कसे वागायचे हे आम्ही मोदींना शिकवू”, असे वक्तव्य खान यांनी केले होते. त्यावर ‘द संडे एक्सप्रेस’शी बोलताना नसीरुद्दीन म्हणाले की, “मिस्टर इम्रान खान यांनी स्वतःच्या देशाबद्दल बोलले पाहीजे. ज्या विषयाशी त्यांचा संबंध नाही, त्यावर बोलू नये. आम्ही ७० वर्षांपासून लोकतंत्र व्यवस्थेमध्ये आहोत. आमची देखभाल आम्हाला करता येते.”

हे वाचा – नसीरुद्दीन शहा यांना आणखी किती स्वातंत्र्य हवे आहे? – अनुपम खेर

शनिवारी पाकिस्तानमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना इम्रान खान यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्याचा धागा पकडून सदर वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, “नसीरुद्दीन शाह यांना आपल्या मुलांना घेऊन भारतात राहण्याची चिंता लागलेली आहे. त्याप्रमाणेच जिना देखील म्हणाले होते की त्यांना भारतात रहायचे नाही. कारण येथे मुसलमानांना समान अधिकार दिले जाणार नाहीत.”

- Advertisement -

इम्रान खान पुढे म्हणाले की, “आमचे सरकार अल्पसंख्यांकांना त्यांचे अधिकार देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचाही हाच दृष्टीकोन होता. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकाना सुरक्षित वाटावे, त्यांना समान अधिकार मिळावा यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत. मात्र भारतात अल्पसंख्यांकाना समान अधिकार नसून त्यांच्यासोबत गैरव्यवहार केला जात आहे.”

“सध्या देशात भीतीदायक वातावरण आहे. माझ्या मुलांना जर गर्दीने घेरले आणि विचारले की तुम्ही हिंदू आहात की मुसलमान? तर काय होईल. समाजात आज विष पसरले आहे आणि हे थांबवणे अवघड झाले आहे. जे कायदा हातात घेत आहेत, त्यांना मोकळीक दिली जात आहे. आपण पाहिले की पोलिसाच्या मृत्यूपेक्षा गायीच्या मृत्यूला अधिक महत्त्व दिले जात आहे.”, असे वक्तव्य नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर देशभरात याबद्दल अनेकांनी खेद व्यक्त केलेला आहे.

- Advertisement -

 

हे वाचा – काँग्रेसच्या काळातही व्हायचे फोन टॅपिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -