घरमहाराष्ट्रअपयशाचीही जबाबदारी घेणारं नेतृत्व हवं - गडकरी

अपयशाचीही जबाबदारी घेणारं नेतृत्व हवं – गडकरी

Subscribe

नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या नेतृत्वावर भाष्य केले आहे. ज्याप्रमाणे यशाचे श्रेय घ्यायला सगळे पुढे येतात त्याप्रमाणे अपयशाचीही जबाबदारी घेणारे नेतृत्व हवे, असे गडकरी म्हणाले आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक मतांनी विजयी ठरले होते. यावेळी विजयाचे सर्व श्रेय देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेले होते. यानंतर आता काही दिवसांपूर्वी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणूकीत भाजपचा फज्जा उडाला. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांनी बऱ्याच ठिकाणी भाषण केले होते. परंतु, लोकांनी मोदींच्या बोलण्याला महत्त्व दिले नाही. त्यामुळे पाचही राज्यांमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु, हा पराभव मोदींचा नसून भाजपचा आहे, असा नारा भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर केंद्रिय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी यांना टोला दिला आहे. नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यातून नरेंद्र मोदी यांना टोला लगावला गेला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुणे जिल्हा सहकारी बॅंक्स असोशिएसनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलते होते.

हेही वाचा – नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये?

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

नितीन गडकरी म्हणाले की, विजयाचे बाप अनेक असतात, मात्र अपयश अनाथ असते. यशाचे नेतृत्व घेण्यासाठी सर्व असतात. मात्र, अपयश आले की, दुसऱ्याकडे बोट दाखवले जाते. निवडणुकीत हरल्यानंतर ‘मी पैसे मागितले होते, दिले नाहीत’. ‘सभा मागितली होती, सभा दिली नाही’, असे सांगतात. मात्र, तू आणि तुझा पक्ष विश्वासाहर्ता संपादन करण्यात कमी पडला हे ते विसरतात. त्यामुळे अपयशाचेही श्रेय घेण्याची वृत्ती नेतृत्त्वात असायला हवी, असे गडकरी म्हणाले. काही दिवसांपूर्वी पाच राज्यांची विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. परंतु, या पराभवाचे नेतृत्व कुणीही स्विकारले नाही. या निवडणुकीच्या प्रचारसभेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले होते. परंतु, तरीही या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. या पराभवाचे नेतृत्व मोदींनी स्विकारले नाही. त्यामुळे नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदी यांनाच टोला दिला की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

हेही वाचा – भाजप नेत्यांनी तोंड बंद ठेवण्याची गरज – नितीन गडकरी

- Advertisement -

२०१९ची निवडणुकीची जबाबदारी गडरींकडे?

नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या नेतृत्वावर भाष्य केले आहे. ज्याप्रमाणे यशाचे श्रेय घ्यायला सगळे पुढे येतात त्याप्रमाणे अपयशाचीही जबाबदारी घेणारे नेतृत्व हवे आहे, असे गडकरी म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी २०१९च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी नितीन गडकरींच्या हाती नेतृत्व द्यावं अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली होती. त्यामुळे गडकरी यांचे वक्तव्य आणि किशोर तिवारी यांची मागणी या घटनांमधून २०१९ ची निवडणुकीची जबाबदारी खरोखरच गडकरी यांच्याजवळ येणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात रंगला आहे.


हेही वाचा – २०१९ची जबाबदारी नितीन गडकरींकडे द्या – तिवारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -