घरमहाराष्ट्रअनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार? राऊत म्हणतात कॅमेरे तयार ठेवा

अनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार? राऊत म्हणतात कॅमेरे तयार ठेवा

Subscribe

परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अ‍ॅड. अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली असून उद्या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी अनिल परब यांना बोलावण्यात आलं आहे. कोणत्या प्रकरणाशी संबंधित चौकशीला बोलावलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान अनिल परब आज शिवेसेनेचे खासादर आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल परब चौकशीला ईडी कार्यालयात जाणार का? याचं उत्तर दिलं.

अनिल परब यांनी आज संजय राऊत यांची ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल परब मला नेहमीच भेटत असतात. ईडीची नोटीस आली म्हणून आमच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळत नाही. कर नाही तर डर कशाला. आम्ही जाऊ ना समोर. ईडीला काय धमक्या देणार नाही, असं राऊत म्हणाले. पुढे राऊत यांना अनिल परब चौकशीला जाणार का? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर राऊत यांनी कॅमेरे लावून ठेवा, असा सूचक इशारा दिला. शेवटी कायदेशीर लढाई आहे. कायदेशीर लढाया त्याच पद्धतीने लढायच्या असतात. अनिल परब हे वकील आहेत त्यांना माहिती आहे काय करायचं ते, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

शिवसेना हे टार्गेट आहे

शिवसेना हे टार्गेट आहे. हे टार्गेट का केलं जात हे सर्वांना माहिती आहे. पण याचा तसूभरही परिणाम सरकारवर होणार नाही. शिवसेनेचं मनोधैर्य खचणार नाही. किंबहूना ते अधिक मजबूत होत आहे, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा – सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील – संजय राऊत

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -