घरताज्या घडामोडीकोरोनाच्या काळात भाजप मंत्री उषा ठाकूरांचं अजब विधान; म्हणाल्या, 'टंट्या मामाचं ताबीज...

कोरोनाच्या काळात भाजप मंत्री उषा ठाकूरांचं अजब विधान; म्हणाल्या, ‘टंट्या मामाचं ताबीज संरक्षण करणार’

Subscribe

जगभरात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यादरम्यान कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट येऊन धुमाकूळ घालत आहेत. आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत जगभरात पसरली आहे. या कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरापासून भाजपचे अनेक नेते कोरोनाला रोखण्यासाठी अजब दावा करताना दिसत आहेत. कोणी भाजप नेता म्हणतोय अंगभर चिखल लावून शंख वाजवा यामुळे कोरोनापासून बचाव होईल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. तर कोणी भाजप नेता कोरोनापासून वाचवण्यासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला देत आहे. अशा प्रकारे अजब विधाने भाजपचे नेते मंडळी करताना दिसत आहेत. या अजब विधानांचे सत्र अजूनही सुरू आहे. सांस्कृतिक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी रोगापासून संरक्षण करण्यासाठी लोकांना अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे उषा ठाकूर सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

काय म्हणाल्या उषा ठाकूर?

‘सर्व रोगापासून आपलं संरक्षण टंट्या मामाचं ताबीज करेल. कोरोनाच्या काळात लाखो गर्दी एकत्र आली तरी टंट्या मामाचं ताबीज घातल्यामुळे काहीही होणार नाही. कोणताही आजार बरा होईल,’ असं विधान उषा ठाकूर यांनी केलं.

- Advertisement -

दरम्यान दरवर्षी ४ डिसेंबरला मध्य प्रदेशमध्ये टंट्या मामा भिल यांचा बलिदान दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने लाखो अदिवासी लोकं एकत्र येतात. त्यामुळे कोरोना काळात या उत्सवात गर्दी जमू नये यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यादरम्यान उषा ठाकूर यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

याआधी काही महिन्यांपूर्वी उषा ठाकूर यांना असं अजब विधान केलं होत की, ‘कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी त्या हनुमान चालीचे पठण करतात, रोज शंख फुंकतात, काढा पितात, शेणाऱ्या गोवऱ्यांवर हवन करतात. यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. आयुष्य ज्याला उत्तम पद्धतीने जगायचे आहे, त्याने वैदिक जीवनशैली अंगीकारली पाहिजे. यामुळे कुठलाही आजार त्या व्यक्तीला स्पर्श करू शकत नाही.’

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -