घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉन विरोधात भारतातील लस प्रभावी नाही, Task Force चे चिंता...

Omicron Variant: ओमिक्रॉन विरोधात भारतातील लस प्रभावी नाही, Task Force चे चिंता वाढवणारे वक्तव्य

Subscribe

सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. कारण आता ओमिक्रॉनचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अशात टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी मंगळवारी चिंता वाढवणारे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, या व्हेरिएंट विरोधात सध्या उपलब्ध असलेल्या लसी असरहीन असू शकतात. सध्या या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटनसह जगातील अनेक देशांमध्ये बूस्टर डोस दिला जाते आहे. परंतु भारतामध्ये अजूनपर्यंत बूस्टर डोस देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

डॉ. वीके पॉल नक्की काय म्हणाले?

कोरोनाच्या अनुषंगाने टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. वीके पॉल यांनी उद्योग संघटना सीआयआयकडून आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात म्हणाले की, ओमिक्रॉन व्हेरिएंट विरोधात आपल्या लसी असरहीन दिसू शकतात आणि याची शक्यता अधिक आहे. पण याबाबत अद्याप स्पष्टपणे असे काही समोर आले नाही. ओमिक्रॉन खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे हे गरजेचे आहे की, आपल्याकडे लस बनवण्यासाठी अशा प्लॅटफॉर्मची सुविधा असो, ज्याच्या मदतीने व्हायरसच्या बदलत्या स्वरुपानुसार कमी वेळेत प्रभावी लस तयारी केली जाऊ शकेल. सर्वांचे लसीकरण करणे हे सरकारचे पहिले प्राधान्य आहे.

- Advertisement -

J&J लस ओमिक्रॉन विरोधात असरदार नाही

दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा ओमिक्रॉन व्हेरिएंटवर होणारा परिणामाबाबत दक्षिण आफ्रिकेच्या व्हायरोलॉजिस्टचे नवीन अध्ययन जारी केले आहे. जोहान्सबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर पेनी मूर म्हणाले की, ही लस ओमिक्रॉन विरोधात अँटीबॉडी विकसित करून शकत नाही. ओमिक्रॉनपासून थोडीच सुरक्षा ही लस देते. पण ही सुरक्षासुद्धा शरीरात पहिल्यापासून असलेल्या इम्यून सेलमुळे मिळत आहे.

या अध्ययनासाठी त्यांनी फायझर, बॉयोएनटेक आणि जॉन्सन अंड जॉन्सन लस घेतलेल्या लोकांच्या ब्लड सँपल्सवर ओमिक्रॉनचा परिणाम टेस्ट केला. या टेस्टमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन लस घेतलेल्या लोकांमध्ये इतरांपेक्षा खूप कमी अँटीबॉडीचे प्रमाण आढळून आले.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉमसह गंभीर आजारांपासून बचाव करेल Pfizer ची गोळी!


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -