Omicron Variant: ओमिक्रॉमसह गंभीर आजारांपासून बचाव करेल Pfizer ची गोळी!

Pfizer says its Covid pill will protect against severe disease, even from Omicron
Omicron Variant: ओमिक्रॉमसह गंभीर आजारांपासून बचाव करेल Pfizer ची गोळी!

सध्या ओमिक्रॉनमुळे (Omicron variant) जगावर भीतीचे सावट पसरले आहे. ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा जास्त वेगाने जगभरात पसरत आहे. अशात अमेरिकेच्या औषध कंपनीने एक दिलासादायक माहिती दिली आहे. अमेरिकेची औषध कंपनी फायझर एक अशी गोळी (Pfizer Pill) तयार करत आहे, जी ओमिक्रॉनसह अनेक प्रकारच्या गंभीर आजारांपासून रुग्णांचा बचाव करेल असा दावा केला आहे. ही गोळी लक्षणे दिसताच तीन दिवसात घेतली तर रुग्णालयात भरती होण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका ८९ टक्क्यांपर्यंत कमी करेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. फायझरच्या या कोरोना गोळीवर केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, ही गोळी गंभीर आजारांपासून जीव वाचवण्याचे काम करते.

कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली की, त्यांची अँटीव्हायरल गोळी लॅबमध्ये झालेल्या परीक्षणांमध्ये ओमिक्रॉनविरोधात प्रभावी दिसली आहे. युरोप, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत ओमिक्रॉनच्या केसेस झपाट्याने वाढत आहे. फायझरचे सीईओ अल्बर्ट बोर्ला म्हणाले की, आम्हाला खात्री आहे की, जर या गोळीचा वापर करण्यास मंजूरी मिळाली तर ही कोरोना महामारीपासून आरोग्याचे संरक्षणात्मक कवच प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. गेल्या महिन्यात फायझरने फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) या गोळीसाठी मंजूरी मागितली होती.

मंगळवारी फायझर म्हणाले की, जर पॅक्सलोविड (Paxlovid) लक्षणे दिसताच तीन दिवसात दिली गेली तर रुग्णाला रुग्णालयात भरती होण्याचा धोका आणि मृत्यूचा धोका ८९ टक्क्यांपर्यंत कमी करते. जर संसर्ग झाल्याच्या पाच दिवसात ही गोळी दिली तर ८८ टक्के मृत्यू आणि रुग्णालयात भरती होण्याचा धोका कमी करते. हा दावा २२४६ लस न घेतलेल्या स्वयंसेवकांवर केलेल्या परीक्षणांच्या आधारे केला गेला आहे. ही छोट्याशा रुपात झालेली ही क्लिनिकल ट्रायल होती.

फायझरच्या माहितीनुसार, पॅक्सलोविड घेतलेल्या ०.७ टक्के रुग्णांना ट्रायलच्या २८ दिवसांच्या आत रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. परंतु कोणाचाही मृत्यू झाला नाही. तर याउलट ज्या ६.५ रुग्णांना प्लेसबो देण्यात आले, त्यापैकी ६.५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली. तसेच त्यांचा मृत्यूही झाला.


हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनबाबत WHOचं चिंताजनक वक्तव्य; मृत्यूदरात होऊ शकते वाढ