घरदेश-विदेश'तेजस' एक्स्प्रेस होणार देशातील पहिली खासगी ट्रेन?

‘तेजस’ एक्स्प्रेस होणार देशातील पहिली खासगी ट्रेन?

Subscribe

रेल्वे खासगीकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी रेल्वेकडून १०० दिवसांचे एक लक्ष्य निर्धारित

दिल्ली ते लखनऊ दरम्यान सुरु असलेली तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी ट्रेन होणार असून रेल्वेसंबंधीच्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय १० जुलैपर्यंत होणार असल्याची माहिती ‘आयआरसीटीसी’ने दिली आहे. नुकताच सादर झालेला अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणासाठी पहिले पाऊल उचल्याचे दिसत आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून १०० दिवसांचे एक लक्ष्य निर्धारित

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या खासगीकरणाचा निर्णय घेण्यासाठी रल्वे मंत्रालयाकडून १०० दिवसांचे एक लक्ष्य निर्धारित करून त्या संदर्भात अजेंडाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार, सुरुवातीला देशात दोन खासगी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी ट्रेन होणार आहे. रेल्वेचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकार आक्रमक झाले असले तरी या निर्णयाला आम्ही विरोध करू, असे ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेन’ (NFIR) ने म्हटले आहे.

अशी असेल देशातील पहिली खासगी ट्रेन

  • देशातील तेजस ही पहिली ट्रेन तासाला २०० किलोमीटर धावते.
  • तेसजच्या प्रत्येक डब्याला बनवण्यासाठी ३ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च आला आहे. तसेच, यामध्ये स्वयंचलित प्लग टाइप दरवाजे बसविण्यात आले आहेत.
  • मेट्रो ट्रेनचे ज्यापद्धतीने दरवाजे बंद होतात, त्याचप्रमाणे तेजस एक्स्प्रेसचे दरवाजे ऑटोमेटिक बंद होणार आहे.
  • धावत्या ट्रेनमध्ये दरवाजे उघडणार नाहीत, ज्यावेळी ट्रेन थांबेल, त्याचवेळी दरवाजे उघडतील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -