घरमुंबईकाँग्रेस नेत्यांमुळेच माझा पराभव - उर्मिला मातोंडकर

काँग्रेस नेत्यांमुळेच माझा पराभव – उर्मिला मातोंडकर

Subscribe

लोकसभा निवडणुकीत काही काँग्रेस नेत्यांमुळेच आपला पराभव झाल्याचे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या आहेत. त्यांनी मिलिंद देवरा यांना लिहलेल्या पत्रात आपल्या पराभवाचा ठिपका नेत्यांवर ठेवला आहे.

लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी मतदारसंघातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर आपल्या पराभवाचा ठपका ठेवला आहे. उर्मिला यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे. अकार्यक्षमता, नियोजनात कमतरता, कार्यकर्त्यांशी गैरवर्तवणूक आणि पैशांचा अभाव यामुळे पराभव झाल्याचे उर्मिला यांनी पत्रात म्हटले आहे. उर्मिलाने आरोप केलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये निवडणूक प्रचाराचे चीफ कोर्डिनेटर संदेश कोंडविलकर, पक्षाचे पदाधिकारी भूषण पाटील आणि जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राले यांचा समावेश आहे.

नेमके काय म्हटले आहे पत्रामध्ये?

उर्मिला मातोंडकर यांनी हे पत्र १६ मे रोजी लिहले होते. या पत्राची माहिती आता उघड झाली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ‘त्यांनी जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांकडून हवी तशी मदत मिळाली नव्हती. खासकरुन संदेश कोंडविलकर, भूषण पाटील आणि अशोक सुत्राले यांच्याकडून अपेक्षित अशी मदत मिळालीच नाही.’

- Advertisement -

भाजपच्या गोपाल शेट्टींकडून उर्मिलांचा पराभव

लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांनी चांगली मेहनत केली होती. मतदारसंघातील विविध भागांमध्ये त्यांनी प्रचार केला होता. याशिवाय त्या स्वत: एक सेलेब्रेटी असल्यामुळे त्यांच्या प्रचारसभांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळायची. त्यामुळे भाजपचे उमेदवार गोपाल शेट्टी यांच्यासमोर उर्मिला मातोंडकरांचा पराभव करणे मोठे आव्हान होते. मात्र, हे आव्हान गोपाल शेट्टी यांनी पूर्ण करुन दाखवले आणि उर्मिला मातोंडकरांचा पराभव झाला.


हेही वाचा – रावसाहेब दानवेंना शिवसेनेचा धोबीपछाड; ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -