घरदेश-विदेशरुग्णालयाचा निष्काळजीपणा; बेडवरून पडल्याने कोरोना रूग्णाचा तडफडून मृत्यू

रुग्णालयाचा निष्काळजीपणा; बेडवरून पडल्याने कोरोना रूग्णाचा तडफडून मृत्यू

Subscribe

करीमनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णचा बेडवरून पडल्याने मृत्यू झाला

तेलंगणाच्या करीमनगरमधील कोरोना रूग्णाकडे दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करीमनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णचा बेडवरून पडल्याने मृत्यू झाला आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयात झालेल्या या घटनेत ७० वर्षाच्या कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णाला २२ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.

मृत व्यक्ती हा गंगाधर मंडळाच्या वेंकटैयापल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मृताला श्वास घेण्यात त्रास होत होता. यामुळे त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. रविवारी हा रुग्ण बेडवरून खाली पडला आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबला. यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रूग्णालयातील वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रूग्णांचा असा आरोप आहे की, ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या बेडवरून खाली पडल्याची बातमी तातडीने रुग्णालय व्यवस्थापनापर्यंत पोहोचविली गेली, परंतु वेळीच आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत. श्वास घेण्यास अडचण आल्यामुळे रुग्णाला त्रास होत होता, पण रुग्णालयाकडून कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. अखेर या रुग्णाचा मृत्यू झाला.

दरम्यान, बेडवरुन पडलेल्या रूग्णाचा आणि साथीदारांच्या तक्रारीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. रुग्णालय प्रशासनाने हा अपघात स्वीकारताना या दुखद घटनेमागील वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या अभावाचा ठपका ठेवला.

- Advertisement -

रविवारी करीमनगरमध्ये कोरोनाचे ५१ नवीन रुग्ण आढळले. रविवारी तेलंगणामध्ये १५०० पेक्षा जास्त नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. रविवारपर्यंत राज्यात एकूण रुग्णांची संख्या ५४ हजारांच्या पुढे गेली असून त्यामध्ये ४६३ लोकांचा मृत्यू झाला आहे.


भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक, पुन्हा एकदा ४७ चीनी Apps वर बंदी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -