घरदेश-विदेशदहशतवादी यासिन भटकळसह ११ जणांवर न्यायालयाने केली आरोपनिश्चिती

दहशतवादी यासिन भटकळसह ११ जणांवर न्यायालयाने केली आरोपनिश्चिती

Subscribe

दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासीन भटकळ याला न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. तर याव्यतिरिक्त, न्यायालयाने मोहम्मद दानिश अन्सारी यांच्यासह ११ जणांवर आरोप निश्चित केले आहेत.

न्यायालयाने दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीन (आयएम)चा सहसंस्थापक यासीन भटकळ आणि इतर ११ जणांना 2012 मध्ये देशाविरुद्ध अतिरेकी कारवायांचा कट रचल्याबद्दल प्रथमदर्शनी दोषी ठरवले आहे. भटकळ आणि अन्य आरोपी यांच्यातील संभाषणावरून हे स्पष्ट झाले आहे की त्यांनी सुरतमध्ये अणुबॉम्बचा स्फोट करण्याचा कट रचल्याचे न्यायालयात सांगण्यात आले आहे.

पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी सांगितले की, आरोपींनी केलेल्या चॅटमधून सूरत शहरात अणुबॉम्बच्या आधारे स्फोट घडवून आणण्याची आयएमने योजना आखली होती, असे स्पष्ट झाले आहे. पण स्फोट घडवून आणण्यााआधी सुरत शहरातील मुस्लिमांना पळवण्याचा देखील कट आखण्यात आला होता. भटकळ व्यतिरिक्त, न्यायालयाने मोहम्मद दानिश अन्सारी यांच्यासह अनेक सदस्यांवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले असून आरोपींवर खटला चालवण्यासाठी पुरेशी कारणे असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, भटकळ याआधीच्या दहशतवादी कारवाया करण्यात इतर आरोपींसोबतच सहभागी होता असे नाही, तर नेपाळमधील माओवाद्यांच्या मदतीने शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा गोळा करण्यासाठी भविष्यातील दहशतवादी कारवायांचे नियोजन करण्यातही तो सहभागी झाला होता.

- Advertisement -

साक्षीदारांच्या जबाबावरून हे स्पष्ट होते की आरोपींनी दहशतवाद निर्माण करण्यासाठी आणि संपूर्ण समाज अस्थिर करण्यासाठी विविध दहशतवादी कारवाया करण्याचा मोठा कट रचला होता, असे देखील न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

न्यायालयाने यासीन भटकळ, अन्सारी, मोहम्मद आफताब आलम, इम्रान खान, सय्यद, ओबेद उर रहमान, असदुल्ला अख्तर, उझैर अहमद, मोहम्मद तहसीन अख्तर, हैदर अली आणि झिया उर रहमान यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. यासोबतच न्यायालयाने मंझर इमाम, अरिज खान आणि अब्दुल वाहिद सिद्दीबप्पा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे देण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरल्याची माहिती न्यायालयाकडून देण्यात आलेली आहे.


हेही वाचा – दीपाली सय्यदने स्वीकारले पाकिस्तानी नागरिकत्व? जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -