घरठाणे'उबाठा'च्या महिलेला मारहाण, आव्हाडांचा पोलिसांवर निशाणा; म्हणाले, 'पोलिसांचे ठाण्यात अस्तित्व नाही'

‘उबाठा’च्या महिलेला मारहाण, आव्हाडांचा पोलिसांवर निशाणा; म्हणाले, ‘पोलिसांचे ठाण्यात अस्तित्व नाही’

Subscribe

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहेत. तसेच, 'सरकार कसे चालवायचे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून शिकावे. पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही ठाण्यात. विचारले तर पोलिस सांगतात वरुन प्रेशर आहे.. वरुण म्हणजे?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडच्या कासरवडवली परिसरात ही घटना घडली. ऑफिसचे काम संपवत घरी जात असताना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी रोषणी यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहेत. तसेच, ‘सरकार कसे चालवायचे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून शिकावे. पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही ठाण्यात. विचारले तर पोलिस सांगतात वरुन प्रेशर आहे.. वरुण म्हणजे?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (NCP Leader Jitendra Awhad Share CCTV Footage OF Thackeray Group Women Beaten Up By Shiv Sena Office bearers On Twitter VVP96)

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका महिलेला मारहाण महिलांकडून मारहाण होत असल्याचे दिसत आहे. ज्या महिलेला मारहाण केली जात आहे ती, ठाकरे गटाची महिला पदाधिकारी असून रोषणी शिंदे असे तिचे नाव आहे. तसेच, ज्या महिलांनी रोषणीला मारहाण केली त्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी असल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाडांचा ट्वीटमधून पोलिसांना सवाल

“ठाकरे गटाची रोशनी शिंदे हिला ठाण्यात शिंदे गटाकडून मारहाण… मला खात्री आहे काही होणार नाही.. न्यायची अपेक्षा सोडली,… सरकार कसे चालवायचे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून शिकावे.. पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही ठाण्यात … विचारले तर पोलिस सांगतात वरुन प्रेशर आहे.. वरुण म्हणजे?”, असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

ट्विटरवर व्हिडीओ शेअर

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हड ट्विटर ठाण्यातील मारहाणीचे व्हिडीओ शेअर करत आहे. नुकताच आव्हाडांनी ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी यांना चोप दिला आहे. शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर आणि त्यांचे सहकारी शिवसैनिक यांनी गिरीश कोळी यांना जोरदार मारहाण केल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला रोषणी शिंदे यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ठाण्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याता प्रश्न वारंवार आव्हाडांकडून उपस्थित केला जात आहे.


हेही वाचा – ठाण्यात ठाकरे गटाच्या महिलेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; अद्याप कारवाई नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -