घरताज्या घडामोडीहवामान खात्याकडून आज दिल्लीसह 'या' राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा

हवामान खात्याकडून आज दिल्लीसह ‘या’ राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा

Subscribe

भारताची राजधानी दिल्ली येथे आज दिवसभर ढगाळ वातावरण असेल तसेच हल्का पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाचा अंदाजानुसार १५ जून पासून २० जून पर्यंत रोज पाऊस पडू शकतो

गरमीने हैराण झालेले दिल्ली सहित उत्तर भारतातील लोक गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या येण्याची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची अपडेट जाहिर केली आहे. भारताची राजधानी दिल्ली येथे आज दिवसभर ढगाळ वातावरण असेल तसेच हल्का पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाचा अंदाजानुसार १५ जून पासून २० जून पर्यंत रोज पाऊस पडू शकतो. तसेच या सर्व दिवसांसाठी यलो अलर्ट सुद्धा जाहिर केला आहे. या दिवसांमध्ये गरमीपासून सुटका होईल आणि हवामान तापमान ३५ किंवा २६ डिग्री सेल्सियस असेल.

या राज्यांमध्ये आज जास्त पाऊस पडण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, आज पूर्वोत्तर भारत, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि विदर्भ, , तेलंगना, मराठवाडा, तमिळनाडू आणि केरळमध्ये हल्का पाऊस पडू शकतो. तसेच यांपैकी काही ठिकणी मुसळधार पावसाची शक्यचा वर्तवली जात आहे. ओडिसा, झारखंडचा काही भाग, बिहार, छत्तीसगढ, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह आणि लक्षद्वीपमध्ये हल्का मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, पश्चिम हिमालय आणि पश्चिम मध्य प्रदेश, गुजरातमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हल्का पाऊस पडण्याची शक्यता सांगितली जात आहे.

- Advertisement -

या राज्यामध्ये पुढील ३ दिवसात पावसाची एन्ट्री
हवामान विभागाच्या माहिती नुसार उत्तर पश्चिमची खाडी, ओडिसातील काही भाग , पश्चिम बंगाल , झारखंड, संपूर्ण उपहिमालय क्षेत्र, बिहारमधील काही भागांमध्ये २ ते ३ दिवसानंतर मान्सून एन्ट्री करतील. तसेच दिल्ली, हरियाणा, पंजाब, पश्चिम यूपीमध्ये २५ जूनपर्यंत मान्सून पोहोचू शकतो.

हिमालयमध्ये आज हवामान बदलण्याची शक्यता
हिमाचल प्रदेशमध्ये बुधवारपासून वातावरणात बदल होऊ शकतो. हवामान खात्याने जोरदार पावसाचा अलर्ट जाहिर केला जातो.


हेही वाचा :Live Update : राष्ट्रपती पदावर रबर स्टँप हवे असतील तर अनेक नेत्यांची रांग तयार- संजय राऊ

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -