घरदेश-विदेशफैजाबाद छावणीचं नाव बदललं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून नव्या नावाची घोषणा

फैजाबाद छावणीचं नाव बदललं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून नव्या नावाची घोषणा

Subscribe

देशाच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फैजाबाद छावणीचं नाव बदलून अयोध्या छावणी ठेवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने फैजाबाद जिल्ह्याचं नाव अयोध्या केलं होतं. त्यानंतर, आता छावणीचं नाव अयोध्या छावणी ठेवण्यात आलं आहे.

५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीचा पाया घातला होता. त्यानंतर मंदिर निर्मितीला सुरुवात केली. यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता फैजाबाद छावनीचे नाव बदलून अयोध्या छावणी करण्यात आलं आहे.

- Advertisement -


योगी आदित्यनाथ यांनी २०१८ मध्ये फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या ठेवलं होतं. तसंच, योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील मेडिकल कॉलेजचे नाव राजर्षी दशरथ असे ठेवलं होतं. तर भगवान श्रीराम यांचे नाव विमानतळाला देण्याची घोषणा त्यांनी केली. त्या आधी योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -