घरदेश-विदेशगरिबी हटाव योजना फक्त महिलांसाठीच काँग्रेसचा यू टनर्र्

गरिबी हटाव योजना फक्त महिलांसाठीच काँग्रेसचा यू टनर्र्

Subscribe

देशातील ज्या गरीब कुटुंबांचे मासिक उत्पन्न १२ हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा ६ हजार रुपये देण्याची योजना काँग्रेसने केंद्रात सत्तेत आल्यावर राबवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याद्वारे देशातील गरिबीवर हल्ला करणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर केले होते.

मात्र या घोषणेला काही तास उलटत नाहीत तोच काँग्रेसने यू टर्न घेतला आहे. ही योजना सर्वांसाठी नाहीतर फक्त महिलांसाठीच असल्याचा खुलासा काँग्रेसकडून करण्यात आला.

- Advertisement -

काँग्रेसने जाहीर केेलेल्या नव्या गरिबी हटाव योजनेचा फायदा देशातील २५ कोटी लोकांना होणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा बोझा पडणार आह

ही योजना प्रत्यक्षात उतरणे अवघड असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे देशभरातून काँग्रेसवर जोरदार टीका होऊ लागली. किमान मूलभूत उत्पन्न हमी योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचे उत्पन्न दरमहा १२ हजारांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्यात येणार

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते. तसेच या योजनेचा लाभ देशातील २५ कोटी लोकांना होणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र ही योजना फक्त स्त्रियांसाठीच लागू होणार असल्याचा कुठेही उल्लेख राहुल गांधी यांनी केला नव्हता. मंगळवारी मात्र काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही योजना केवळ स्त्रियांपुरतीच मर्यादित असल्याचे सांगितले. तसेच या योजनेचा लाभ गावांप्रमाणेच शहरातील स्त्रियांनाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात गरिबांसाठीच्या २२ टक्केे योजना आहेत. मात्र आमच्या योजनेमुळे या योजना निकाली निघतील, असा दावा सुरजेवाला यांनी केला. यावेळी त्यांनी या योजनेला विरोध करणार्‍या भाजपवर टीका केली. श्रीमंतांचं कर्ज माफ करणारेच आज गरिबांच्या योजनेला विरोध करत असून विरोध करणारे ढोंगी आहेत, अशी टीका त्यांनी केली. तसेच १० लाखांचा सूट परिधान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या या योजनेला विरोध का करत आहेत? असा सवालही त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -