घरदेश-विदेशपेरुमध्ये सापडली ३ बोटांची 'ममी'! एलियन असल्याचा दावा

पेरुमध्ये सापडली ३ बोटांची ‘ममी’! एलियन असल्याचा दावा

Subscribe

पेरू देशामध्ये 5.6 फुट लांबीची ३ बोटंवाली ममी सापडली आहे. ही ममी एलियन असल्याचं संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे.

पृथ्वीवर एलियन येऊन गेल्याचे अनेक किस्से आजवर आपण ऐकले. आतापर्यंत अनेक शोधकर्त्यांनी पृथ्वीवर एलियन येऊन गेल्याचा दावा केला आहे. नुकताच अशाप्रकरचा दावा पुन्हा एकदा करण्यात आला आहे. पेरू देशातील काही शास्त्रज्ञांनी नुकतीच आढळलेली एक ‘ममी’ एलियन असल्याचा दावा केला आहे. आजवर उत्खननामध्ये मिळालेल्या ममींपेक्षा ही ‘ममी’ खूप वेगळी असल्यामुळे ती एलियन असल्याचा दावा करण्यात येत आहे. या ममीची उंची ५.६ फूट असून तिला फक्त तीनच बोटं आहेत. जाणून घेऊया यामगे काय आहे नेमकं सत्य.

- Advertisement -

३ बोटांचा ‘एलियन’?

संशोधनकर्त्यांच्या एका टीमने असं म्हटलं आहे, की ”पेरूमध्ये सापडलेली ही ममी अन्य ममींसारखी नाही. या ममीची शारिरीक रचना माणसारखी असली तरी तिला असलेली ३ बोटं अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करतात. या ममीच्या हाताला आणि पायाला केवळ तीनच बोटं आहेत. शिवाय ममीचं डोकंही सामान्य माणसाच्या डोक्यापेक्षा जास्त लांब आहे.” हाताला किंवा पायाला ३ बोटं असलेला माणूस आढळल्याची अद्याप तरी कुठे नोंद नाही. त्यामुळे ही ममी एलियन आहे, असा संशय असल्याचं संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे.  तसंच या ममीची तपासणी करत असतना एक असाधारण असा DNA सापडला आहे. हा DNA माणसांमध्ये आढळणाऱ्या DNA पेक्षा वेगळा असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. अशा अनेक कारणांमुळे ही ममी माणूस नसून माणसासारखा दिसणारा एलियन असल्याचं बोललं जात आहे.

माणसाच्या नव्या प्रजातीचा शोध?

दरम्यान, संशोधनकर्त्यांनी पेरूमध्ये सापडलेली ही आगळीवेगळी ममी वास्तवात माणसाचीच एक नवी प्रजाती असल्याचा दावा केला आहे. ममीमध्ये सापडलेल्या वेगळ्या प्रकारच्या DNA मुळे संशोधनकर्त्यांनी ही मणासाची एक नवीनच प्रजाती असल्याचं म्हटलं आहे. ‘दरम्यान ममी बाबत करण्यात आलेला हा दावा खरा सिद्ध झाल्यास, एक मोठा शोध लागू शकतो’, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

- Advertisement -

पाहा व्हिडिओ :

व्हिडिओ सौजन्य- Gaia.com

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -