घरमनोरंजन'सिय्यापा'ची लव्ह स्टोरी 'एक लडकी को देखा..'

‘सिय्यापा’ची लव्ह स्टोरी ‘एक लडकी को देखा..’

Subscribe

बाप आणि मुलीचं हे नातं पडद्यावर कसं दिसेल हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं असून पहिल्यांदाच अनिल आणि सोनम कपूर एकत्र काम करत आहेत. टीझर झालं प्रदर्शित.

खऱ्या आयुष्यातील बाप – मुलीची जोडी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपटातून पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येणार आहेत. ही जोडी दुसरी – तिसरी कोणी नसून आहे अनिल कपूर आणि फॅशनिस्ता सोनम कपूरची. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. राजकुमार रावबरोबर सोनम कपूर दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव अनिल कपूर आणि मनिषा कोईरालाच्या ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’ मधील गाण्यावरून ठेवण्यात आलं आहे. तर टीझरची सुरुवातदेखील याच गाण्यानं होताना दिसत आहे. अनिल कपूर यामध्ये एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.

कसा आहे ट्रेलर?

अनिल कपूरनंतर सोनम कपूरचा आवाज येतो, ज्यामध्ये ती म्हणते की, तिची लव्ह स्टोरी सिंपल नाही तर सियाप्पानी (अडचणींनी) भरलेली आहे. चित्रपटाचा टीझर गमतीशीर वाटत असून यातून नक्की काय सियाप्पा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच जागवली आहे. या चित्रपटात अनिल कपूरसह बऱ्याच वर्षांनी जुही चावलादेखील दिसणार आहे. तर सोनम आणि राजकुमार राव पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

- Advertisement -

पहिल्यांदाच शैली चोप्राचं दिग्दर्शन

या चित्रपटाचं दिग्दर्शन शैली चोप्रानं केलं असून हा शैलीचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. शैली ही विधु विनोद चोप्राची बहीण आहे. तर ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विधु विनोद चोप्रांनीच केलं होतं. अनिल आणि जुही ९ वर्षांनी पुन्हा एकत्र काम करत असून हा चित्रपट १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. बाप आणि मुलीचं हे नातं पडद्यावर कसं दिसेल हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -