घरदेश-विदेशप्रकाश आंबेडकरांना पॅलेस्टीनी सरकारचा सन्मान !

प्रकाश आंबेडकरांना पॅलेस्टीनी सरकारचा सन्मान !

Subscribe

राजकीय,सामाजिक कामाबद्दल पॅलेस्टीनी राष्ट्रपतींनी राजदुतामार्फत गौरविले

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना पॅलेस्टाईन सरकारतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय आंदोलनाच्या कार्याबद्दल पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींच्यावतीने भारतातील पॅलेस्टीनी राजदुतांनी नवी दिल्लीत गौरविले. पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अदनान अबुल हाईजा यांनी पॅलेस्टीनी दुतावासात सन्मान चिन्ह देऊन गौरविले.

यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले की, वंचित बहुजन आघाडी पॅलेस्टीनी नागरिक आणि सरकारला बाजूने आहे. पॅलेस्टीनी स्वातंत्र्य लढ्याला आमचा पाठींबा आहे आणि आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभे राहू. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव डॉ. अब्दुल अंजारीया, अ‍ॅड. एस के सागर, डॉ बी. पी निलारत्न (माजी आयएसए अधिकारी) उपस्थित होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -