घरदेश-विदेशट्विटरने योगी आदित्यनाथ यांचे 'ते' वादग्रस्त 'व्हायरस' ट्विट हटवले

ट्विटरने योगी आदित्यनाथ यांचे ‘ते’ वादग्रस्त ‘व्हायरस’ ट्विट हटवले

Subscribe

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ट्विटर इंडियाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वायरसचे ट्विट भारतात दिसण्यावर बंदी घातली आहे.

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यास निवडणूक आयोग त्याची गांभिर्याने दखल घेते, याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ट्विटर इंडियाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्हायरसचे ट्विट भारतात दिसण्यावर बंदी घातली आहे. म्हटले जाते की, ट्विटर इंडियाने भाजपचे नेता गिरिराज सिंग, एमएलए मनजिंदर सिंग सिरसा, अभिनेत्री कोयना मित्रा यांच्या सांप्रदायिक प्रकृतीच्या ३४ ट्विटच्या विरोधात कारवाई करत त्यांचे ट्विट साइटवरून हटवण्यात आले आहेत. तसेच भारतात ते दिसू नयेत, असे आदेश दिले आहेत.

वादग्रस्त ट्विट

काँग्रेसला व्हायरसची लागण 

यापूर्वी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीगला वायरस समान म्हणणाऱ्या ट्विटरवर कारवाई केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरमध्ये नमूद केले होते की, मुस्लिम लीह एक व्हायरस आहे. एक असं व्हायरस आहे, ज्याचा संसर्ग झाला तर ती व्यक्ती वाचू शकत नाही. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसलाचं याचा संसर्ग झाला आहे. विचार करा जर ते जिंकले तर काय होईल. हा व्हायरस संपूर्ण देशात पसरेल.

- Advertisement -

…आणि देशाची फाळणी केली 

दुसऱ्या एका ट्विटमध्ये योगींनी म्हटले होते की, १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात मंगल पांडेंसोबत संपूर्ण देश इंग्रजांविरोधात होता. त्यानंतर हा मुस्लिम लीगचा व्हायरस आला आणि असा पसरला की त्याने संपूर्ण देशाची फाळणीच करुन टाकली. आज पुन्हा एकदा तोच धोका दिसतो आहे. हिरवे झेंडे पुन्हा फडकावले जात आहेत. काँग्रेस मुस्लिम लीगच्या व्हायरसने संक्रमीत झाली आहे, त्यांच्यापासून सावध रहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -