घरदेश-विदेशभाजपचा आता राजस्थानला घोडेबाजार!

भाजपचा आता राजस्थानला घोडेबाजार!

Subscribe

गेहलोत सरकार संकटात?, भाजपच्या दोन नेत्यांना अटक

कर्नाटक आणि मध्य प्रदेशपाठोपाठ आता भाजपने काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानचे अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार तेज करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी भाजपाच्या दोन नेत्यांना शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले असून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने त्यांना ताब्यात घेतले आहे.

गेहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार करत असल्याच्या आरोपाखाली ब्यावर याठिकाणच्या दोन भाजप नेत्यांचे नाव समोर आले आहे. भरत मालानी आणि अशोक सिंह अशी या नेत्यांची नावे आहेत. त्याना ब्यावर उदयपूरच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली आहे. मालानी यांच्या कॉल रेकॉर्डिंगवरून आमदारांचा घोडेबाजार केला जात असल्याचे समजले, असे या पथकाने म्हटले आहे.सध्या या दोन्ही नेत्यांची जयपूरमध्ये चौकशी सुरू आहे. भरत मालानी यांनी राजस्थान भाजपामध्ये मोठमोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. राजस्थान सरकार पाडण्यासाठी कट रचल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

एफआयआरनुसार काही फोन रेकॉर्डिंग वरून हे प्रकरण उघडकीस आले. गेहलोत सरकार पाडण्यासाठी कट रचला जात असून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वाद सुरू आहेत, असे पसरविले जात आहे. यामुळे काही जण अपक्ष आणि काँग्रेसच्या आमदारांना फोडून सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. भाजपाचे नेते आमदारांना यासाठी पैशांचे लालच दाखवत आहेत आणि आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुप या प्रकरणाचा तपास करत आहे.

एका पत्रकार परिषदेमध्ये गेहलोत यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसमध्येच गटबाजी सुरू आहे का या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री कोणाला व्हावे असे वाटत नाही ? पण, उपमुख्यमंत्र्यांसोबत वाद अजिबात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुपने आमदारांच्या खरेदीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उप मुख्यमंत्री सचिन पायलट आणि महेश जोशी यांनी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. १९ जूनला झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या आमदारांना पैशांचे प्रलोभन दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याची चौकशी ऑपरेशन ग्रुपकडे देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -