घरताज्या घडामोडीमसूरी-देहरादून महामार्गावर बस दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी

मसूरी-देहरादून महामार्गावर बस दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी

Subscribe

मसूरी-देहरादून महामार्गावर बस दरीत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या बसमध्ये जवळपास ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते. मात्र, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर झाल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेची पोलीस आणि आयटीबीपीच्या जवानांनी चौकशी केली. तसेच बस दरीत कोसळ्यानंतर अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. यावेळी तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर १९ जणांना देहरादूनच्या मसूरी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, दुर्दैवीपणे या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच पोलिसांकडूनही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ही घटना मसूरीपासून पाच किमीपर्यंत असलेल्या मसूरी देहरादून महामार्गावर शेरघडी परिसरात घडली. ही बस मेसानिक लॉज बस स्थानकावरून देहराहूनसाठी रवाना झाली होती. मात्र, मसूरी-देहरादून महामार्गावरच बसचा अपघात झाला.

- Advertisement -

बसचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. देहरादून मसूरी महामार्गावर वाहनं आणि प्रवाशांचा खोळंबा झाला होता. जखमींच्या मदतीसाठी १०८ आपत्कालीन सेवाही घटनास्थळी उपलब्ध होत्या. यावेळी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मसुरी ते देहरादूनपर्यंत एकच खळबळ उडाली होती.


हेही वाचा : आर के लक्ष्मणांचे व्यंगचित्र ट्वीट करून संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -