घरदेश-विदेशजपानमध्ये 'जेबी' वादळाचा हाहाकार; ६ जणांचा मृत्यू

जपानमध्ये ‘जेबी’ वादळाचा हाहाकार; ६ जणांचा मृत्यू

Subscribe

जपानमध्ये जेबी वादळणाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते वाहतूक, विमान सेवा, रेल्वे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. आणखी मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

जपानमध्ये मंगळवारी २५ वर्षानंतर सगळ्यात मोठं वादळ आलं आहे. देशाच्या हवामान खात्याने जोरदार वादळ आणि पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम जपानमध्ये दुपारी २१६ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हे वारे वाहत आहेत. उन्हाळ्यात देखील या भागात जोरदार पाऊस झाला होता. या वादळामुळे घरांचे, गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ६ लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

२५ वर्षात सर्वात मोठे वादळ

जपानमध्ये २५ वर्षानंतर मंगळवारी सर्वात मोठे वादळ आले आहे. जोरदार वारा आणि मुसळधार पावसाने जपानला चांगलंच झोडपून काढले आहे. जपानमध्ये सध्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळाचा इशारा दिला आहे. जपानमधून देश-विदेशात जाणाऱी ६०० पेक्षा अधिक विमान उड्डाने रद्द करण्यात आली आहे. हवामान खात्याचे प्रमुख रयुता कुरोरा यांनी म्हटलं की, वादळ त्याच्या केंद्र स्थानापासून १६२ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वाहू शकते. १९९३ नंतर जपानमध्ये शक्तीशाली वादळ आले आहे.

- Advertisement -

नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश

पश्चिम जपानमध्ये २१६ किलोमीटर प्रति तासांच्या वेगाने वारे वाहत आहेत. या चक्रीवादळाला जपानच्या हवामान खात्याने शक्तीशाली म्हटले आहे. या वादळामुळे मोठमोठ्या लाटा, पूर आणि भूस्खलनाच्या घटना होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी नागरिकांनी ताबतोब सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सरकारला वादळामध्ये अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

शाळा, कंपनी, रेल्वेसेवा बंद

या वादळामुळे लोकल ट्रेन आणि हाय-स्पीड रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. कोणताही अनुच्चित प्रकार घडू नये यासाठी काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी घरामधूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच जपानमध्ये ज्याठिकाणी हे वादळ आले आहे त्याठिकाणच्या शाळांना बंद ठेवण्यात आल्या आहेत. जपानमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात आतापर्यंत वादळ आणि मुसळधार पावसामुळे २०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -