घरताज्या घडामोडीधूर निघालाय म्हणजे आग लागलीय, राजीनामा दिल्यावर केंद्रीय मंत्री सुप्रियो यांचे स्पष्ट...

धूर निघालाय म्हणजे आग लागलीय, राजीनामा दिल्यावर केंद्रीय मंत्री सुप्रियो यांचे स्पष्ट वक्तव्य

Subscribe

भ्रष्टाचारा न करता एकही डाग न लागू देता जात असल्याचा अभिमान आणि आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी डझनभर मंत्र्यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. शिक्षणंक्षी, आरोग्यमंत्री, माहिती तंत्रज्ञान मंत्री, यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांचे मंत्रिमंडळात युवांचा समावेश करण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पश्चिम बंगालचे खासदार बाबूल सुप्रियो यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. सुप्रियो यांनी राजीनामा दिल्यानंतर फेसबुक पोस्ट करत स्पष्ट वक्तव्य केलं आहे. राजीनामा देण्यास सांगितल्यानुसार राजीनामा दिला असल्याचे सुप्रियो यांनी सांगितले आहे.

पश्चिम बंगालच्या आसनसोलचे खासदार बाबुल सुप्रियो यांनीही राजीनामा दिला आहे. सुप्रिया यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचं राज्यमंत्री पद होते. मिळालेल्या माहितीनुसार बाबुल सुप्रिया भाजपवर नाराज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सुप्रियो यांनी लढवली पण ते ५० हजार मतांनी पराभूत झाले. सुप्रियो यांनी फेसबुक पोस्ट करत राजीनामा दिला असल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले सुप्रियो

सुप्रियो यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलयं, बरोबर, जेव्हा धूर निघालाय म्हणजे कुठेतरी आग लागलीय, होय, मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मला राजीनामा देण्यास सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांनी मंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच भ्रष्टाचारा न करता एकही डाग न लागू देता जात असल्याचा अभिमान आणि आनंद आहे. परंतु राजीनामा द्यावा लागला याचं दुःख होत आहे. पण इतरांसाठी खुप आनंदी असून त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. अशा आशयाची फेसबुक पोस्ट सुप्रियो यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी १२ पेक्षा अधिक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. रामविलास पासवान, सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे आणि शिवसेना व अकाली दलाने एनडीएतून घेतलेल्या एक्झिटमुळे मोठ्या प्रमाणात मंत्रीपदे रिक्त होते. भाजपच्या मंत्र्यांवरच २ ते ३ खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. ती जबाबदारी आता नव्या चेहऱ्यांच्या खांद्यावर देण्यात येणार आहे.

- Advertisement -

या मंत्र्यांनी दिला राजीनामा

सदानंद गौडा, रवि शंकर प्रसाद, थावर चंद गेहलोत, रमेश पोखरियाल निशंकस, हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, संतोष गंगवार, बाबूल सुप्रियो, संजय धोत्रे, रत्तन लाल कटारिया, प्रताप चंद्र सारंगी, सुश्री देबश्री चौधरी, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -