घरदेश-विदेशModi Cabinet Expansion: प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

Modi Cabinet Expansion: प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री राजीनामे देत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यासह अनेकांना डच्चू देण्यात आला. दरम्यान, आता आणखी दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता पर्यंत १२ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या नावांपेक्षा राजीनामा देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या नावांची चर्चा होत आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांची मंत्रिमंडळातून गच्छंती करण्यात आली होती. त्यानंतर आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार, सदानंद गौडा, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनीही राजीनामे दिले.

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी या मंत्र्यांची गच्छंती

१) सदानंद गौडा

- Advertisement -

२) रवि शंकर प्रसाद

३) थावर चंद गेहलोत

४) रमेश पोखरियाल निशंक

५) हर्ष वर्धन

६) प्रकाश जावडेकर

७) संतोष गंगवार

८) बाबूल सुप्रियो

९) संजय धोत्रे

१०) रत्तन लाल कटारिया

११) प्रताप चंद्र सारंगी

१२) सुश्री देबश्री चौधरी


हेही वाचा – Modi Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराची नावं जाहीर, राणेंना मंत्रीपद, अधिकृत यादी एका क्लिकवर


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -