घरक्राइमUP Crime : संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् त्यानं 'तिचं' शिरच छाटलं!...

UP Crime : संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् त्यानं ‘तिचं’ शिरच छाटलं! कुठे घडलं असं? वाचा-

Subscribe

उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला. एवढेच नाही तर पत्नीचे कापलेले डोके आणि धारदार शस्त्र घेऊन तो रस्त्यावर फिरत होता. हे भीतीदायक चित्र नागरिकांना रस्त्यावर दिसताच अनेकांनी पळ काढल्याची माहिती समोर येत आहे.

लखनऊ : कुटुंब व्यवस्थेतील सर्वात सुंदर नातं म्हणजे पती- पत्नीचं नातं. हे नातं आणखी घट्ट होतं ते एकमेकांवरील विश्वासामुळे. परंतु हाच विश्वासाचा धागा तुटला तर घडतं ते विपरीत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमध्ये घडला आहे. बायकोचे बाहेर कुणाशी तरी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने तिचं शिरच कापलं. एवढंच नव्हे तर कापलेलं शिर घेऊन तो रस्त्यावर फिरत होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (UP Crime The ghost of suspicion entered the head and cut off her head Where did that happen read)

उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला. एवढेच नाही तर पत्नीचे कापलेले डोके आणि धारदार शस्त्र घेऊन तो रस्त्यावर फिरत होता. हे भीतीदायक चित्र नागरिकांना रस्त्यावर दिसताच अनेकांनी पळ काढल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपी पतीला अटक केली. अनिल असे त्या आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

आरोपीस अटक केल्यानंतर पोलिसांनी खून झालेल्या महिलेचे छिन्नविछिन्न स्थितीतील शीर ताब्यात घेतले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी एएसपी सी.एन. सिन्हा यांनी सांगितले की, आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटना घडलेल्या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी शांतता व सुव्यवस्था कायम आहे.

हेही वाचा : Fire News : पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग, नागरिकांमध्ये भीती

- Advertisement -

तो म्हणाला, ‘मी माझ्या पत्नीचा खून केला’

हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसरा गावातील आहे. जिथे अनिल नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीचा गळा चिरून खून केला. यानंतर तो हातात ते कापलेले डोके घेऊन पोलिस ठाण्यात जात होता. मात्र, पोलिसांनी त्याला वाटेतच पकडले. यादरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की, मी माझ्या पत्नीचा खून केला आहे, मला अटक करा.

हेही वाचा : Rohit Pawar : निवडणुकांसाठी या प्रश्नांचा गुंता…; आरक्षणाच्या प्रश्नावरुन रोहित पवारांचा हल्लाबोल

खून करण्यामागील कारणही सांगितले

पोलिसांच्या चौकशीत तो म्हणाला की, माझ्या पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत अवैध संबंध असल्याचा मला संशय होता. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणे झाली. घटनेच्या दिवशीही याच कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर अनिलने धारधार शस्त्राने त्याच्या पत्नीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर पत्नीचे छिन्नविछिन्न शीर हातात घेऊन तो पोलीस ठाण्याकडे रवाना झाला. मात्र, त्याला वाटेत पकडले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -