घरट्रेंडिंगUP Election 2022 : मोदींसारखा दिसणारा अन् ट्रेनमध्ये काकडी विकणारा उत्तर प्रदेशात...

UP Election 2022 : मोदींसारखा दिसणारा अन् ट्रेनमध्ये काकडी विकणारा उत्तर प्रदेशात लढवणार निवडणूक

Subscribe

पंतप्रधानांसारखा दिसणारा हा व्यक्ती कट्टर मोदी भक्त असल्याचं बोललं जात आहे. लखनऊमध्ये स्थायिक असणाऱ्या अभिनंदन पाठकला सर्वजण मोदींचा डुब्लिकेट म्हणून ओळखतात. अभिनंदत हे यंदाच्या उत्तर प्रदेशातील आगामी निवडणूकीत लखनऊच्या सरोजनी नगर मधून अपक्ष म्हणून निवणूक लढवणार असल्याने ते सध्या प्रकाश झोतात आले आहेत.

जगभरामध्ये एकाच चेहऱ्याचे सात लोकं असतात असं म्हटलं जातं, दरम्यान सध्या सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध कलाकारांचे , खेळाडूंसारखे दिसणारे चेहरे व्हायरल झालेले तुम्ही अनेकदा पाहिले देखील असतील.मात्र, आता चक्क पंतप्रधानांचा एक डुब्लिकेटची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. दरम्यान हा पंतप्रधानांसारखा दिसणारा हा व्यक्ती कट्टर मोदी भक्त असल्याचं बोललं जात आहे. लखनऊमध्ये स्थायिक असणाऱ्या अभिनंदन पाठकला सर्वजण मोदींचा डुब्लिकेट म्हणून ओळखतात. अभिनंदत हे यंदाच्या उत्तर प्रदेशातील आगामी निवडणूकीत लखनऊच्या सरोजनी नगर मधून अपक्ष म्हणून निवणूक लढवणार असल्याने ते सध्या प्रकाश झोतात आले आहेत. त्यामुळे त्यांचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

दरम्यान अभिनंदन यांनी पहिले भाजप कडे तिकीटाची मागणी केली.टाईम्स ऑफ इंडियामध्ये दिलेल्या वृत्तानुसार 56 वर्षीय अभिनंदन पाठक सरहानपुरचे रहिवासी आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यापूर्वी भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती.मात्र, पक्षातर्फे त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही.दरम्यान अभिनंदन यांनी ज्या क्षेत्रामधून निवडणूकीच्या तिकीटाची मागणी केली होती. त्या निवडणूकीच्या रिंगणातून लखनऊ मधील सर्वात प्रतिष्ठित जागापैकीच एक आहे.

- Advertisement -

अभिनंदन यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी निवणूकीच्या तिकीटाची मागणी केली. त्यांनी माझ्या पत्राची दखल घेतली नसल्याचं मोदींसारख्या दिसणाऱ्या अभिनंदन यांनी म्हंटल आहे. दरम्यान त्यांनी स्वत ला कट्टर मोदी भक्त असल्याचे सांगितलं आहे. यासह भाजप मला टाळण्याच प्रयत्न करत असून मी अपक्ष कॅटेगरीतून निवडणूकीच्या रिगंणात उतरणार असल्याचं अभिनंदन यांनी म्हटलं आहे. यासह पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर ते दैनंदिन जीवन जगण्यासाठी काकडी विकायचे. दरम्यान आर्थिक परिस्थिती खालवल्याने अभिनंदन यांच्या पत्नीने मीरा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.पाठक यांना 6 मुलं आहेत.यासह त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी आजतागय तीच्याशी संप्रक केला नसल्यांच त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अभिनंदन यांच्यापूर्वी देखील एक व्यक्ती व्हायरल झाला होता.2019 च्या लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचार सभेत जगदीश मोदी या व्यक्तीला देखील लोकांना भूरळ घालण्यासाठी भाजपने मोदींच्या डुब्लिकेटची आयडीया वापली होती. उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यात राजकीय हालचाली सुरु आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार असून, 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. जास्तीत जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे निवडणुक आयोगही निष्पक्ष मतदानासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – मी स्वतः कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जातोय, नितेश राणेंचे वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -