घरताज्या घडामोडीमी स्वतः कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जातोय, नितेश राणेंचे वक्तव्य

मी स्वतः कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जातोय, नितेश राणेंचे वक्तव्य

Subscribe

नितेश राणेंचे वकील सतीष मानशिंदे यांनी कोर्टात जाऊन अर्ज मागे घेतला आहे. तसेच आता नितेश राणे कोर्टासमोर शरण जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाकडून मंगळवारी फेटाळण्यात आला होता. यानंतर नितेश राणेंच्या वकिलांनी हायकोर्टात जामीन अर्ज केला होता. परंतु बुधवारी नितेश राणेंच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे. नितेश राणे कोर्टासमोर शरण आल्यास त्यांच्या कोठडीची मागणी करणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले आहेत. हायकोर्टात धाव घेतल्यानंतर अर्ज मागे का घेण्यात येत आहे? याबाबतची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. कायदेशीर सल्ल्यानंतर अर्ज मागे घेण्यात येत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी कोर्टासमोर आत्मसमर्पण केलं आहे. नितेश राणेंनी जामीन अर्ज मागे घेतला असून कणकवली न्यायालयात शरण आले आहेत. नितेश राणेंना आता अटक होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नितेश राणेंना सर्वोच्च न्यालयाने १० दिवसांचे अटकेपासून संरक्षण दिले होते. परंतु आता शरण गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे अटकेपासून संरक्षण संपले आहे.

- Advertisement -

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. नितेश राणे कणकवली कोर्टासमोर शरण जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नितेश राणेंचे वकील सतीष मानशिंदे यांनी कोर्टात जाऊन अर्ज मागे घेतला आहे. तसेच आता नितेश राणे कोर्टासमोर शरण जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले नितेश राणे ? 

निवासस्थानावरुन निघाल्यानंतर नितेश राणेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नितेश राणे म्हणाले की, काल जिल्हा सत्र न्यायालयाने जे काही जजमेंट दिले आहे त्याचा आदर ठेऊन शरण जाण्यासाटी जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारे आणि बेकायदेशीर पद्धतीने अटक कऱण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मी स्वततः कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात आहे.

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -