घरताज्या घडामोडीUP Election Exit Poll: पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये कमळ फुलण्याचा अंदाज; पाहा...

UP Election Exit Poll: पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये कमळ फुलण्याचा अंदाज; पाहा सपा किती जागा जिंकणार

Subscribe

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा सातवा टप्पा आज संपला आहे. आता १० मार्च मतमोजणी होणार असून त्यापूर्वी एक्झिट पोल सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोणते सरकार येणार हे गुरुवारी मतमोजणीनंतर निश्चित होईल. पण एक्झिट पोलमधून कोणते सरकार येणारे याचे संकेत मिळत आहेत. रिपब्लिक टीव्ही आणि पोल स्ट्रेटच्या ओपिनियन पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एबीपी न्यूजने सी वॉटरसोबत सर्व्हे केला आहे, तर आज तकने एक्सिस माय इंडियासोबत एक्झिट पोल केला आहे.

रिपब्लिक पी. मार्क एक्झिट पोल

रिपब्लिक पी. मार्क एक्झिट पोलनुसार, भाजप पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात बहुमत मिळवू शकते. भाजपला 240 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपाला 140 जागा मिळण्याची भविष्यवाणी केली गेली आहे. तसेच बसपा पुन्हा एकदा 14 जागेवर समाधानी राहावे लागणार आहे. भाजपला 40.1 टक्के जागा मिळू शकतात आणि सपाला 34 टक्के जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर बसपाला 16.3 टक्के मतदान मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पोल स्ट्रेटच्या एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार

पोल स्ट्रेट माहितीनुसार, भाजपला 211 ते 225 जागा मिळू शकतात. तर सपाला 146 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच बसपाला 14 ते 24 जागा मिळू शकतात.

सातव्या टप्प्यात झाले मतदान

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात 11 जिल्ह्यात मतदान झाले. तर 14 फेब्रुवारला 55 जागांवर दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले आणि 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्या मतदान झाले. मग 23 फेब्रुवारीला मतदानाचा चौथा टप्पा पार पडला. त्यानंतर 27 फेब्रुवारीला पाचवा, 3 मार्चला सहावा आणि आज 7 मार्चला सातवा टप्पा पार पडला.

- Advertisement -

2017 मधील निवडणूक

उत्तर प्रदेशमध्ये 2017 मध्ये भाजप प्रचंड बहुमताने विजयी झाले होते. मागील निवडणुकीत भाजपच्या युक्तीला 325 जागा मिळाल्या होत्या. तसेच एकट्या भाजपला 300हून अधिक जागा मिळाल्या होत्या. तर सपाच्या गठबंधनाला 47 जागा मिळाल्या होत्या आणि बसपाला 17 जागांवर समाधान मानावे लागले होते.


हेही वाचा – Chanakya Today Exit Poll: पंजाबमध्ये मोठा फेरबदल; उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरचेही निकाल धक्कादायक


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -