घरदेश-विदेशChanakya Today Exit Poll: पंजाबमध्ये मोठा फेरबदल; उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि...

Chanakya Today Exit Poll: पंजाबमध्ये मोठा फेरबदल; उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरचेही निकाल धक्कादायक

Subscribe

तर न्यूज 24-चाणक्य एक्झिट पोलच्या निकालात उत्तराखंडमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करत असल्याचे दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार 70 जागांच्या उत्तराखंड विधानसभेत भाजपला 43, काँग्रेसला 24 आणि इतरांना 3 जागा मिळत आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या 7 जागांचा फायदा आणि तोटा होऊ शकतो.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर पाच राज्यांच्या एक्झिट पोलचे निकालही येण्यास सुरुवात झालीय. न्यूज 24 आणि टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये पंजाबचे आज आश्चर्यकारक निकाल आलेत. त्यानुसार आम आदमी पार्टी 117 जागांपैकी 100 जागा जिंकत आहे. काँग्रेसला 10, शिरोमणी अकाली दल-बसपा युतीला 6 आणि भाजप आघाडीला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यानुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 45 टक्के मते मिळत आहेत. दुसरीकडे काँग्रेसला 23 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार

तर न्यूज 24-चाणक्य एक्झिट पोलच्या निकालात उत्तराखंडमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करत असल्याचे दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार 70 जागांच्या उत्तराखंड विधानसभेत भाजपला 43, काँग्रेसला 24 आणि इतरांना 3 जागा मिळत आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या 7 जागांचा फायदा आणि तोटा होऊ शकतो. उत्तराखंडमध्ये 52 टक्के लोकांनी सरकार बदलू इच्छित नसल्याकडे कौल दिलाय. मात्र, 41 टक्के लोकांनी सरकार बदलण्याच्या बाजूने कौल दिलाय. न्यूज 24- चाणक्य एक्झिट पोलच्या निकालात यूपी, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

भूतकाळात असे अनेक प्रसंग आलेत, जेव्हा चाणक्य टुडेचे एक्झिट पोलचे निकाल अतिशय अचूक आलेत. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमधील त्यांचे भाकीत अगदी अचूक ठरले आहे. इतकंच नाही तर अनेक विधानसभा निवडणुका आणि अगदी अमेरिका आणि ब्रिटनच्या निवडणुकांमध्ये 100 टक्के अचूक असल्याचा दावा चाणक्यने केलाय. एक्झिट पोलनुसार भाजप उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करत आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्याचे दिसत आहे. गोव्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसून येत आहे. मणिपूरमध्येही भाजपचे सरकार परतत आहे. दुसरीकडे उत्तराखंडसाठी एक्झिट पोलचे निकाल वेगळे आहेत.


हेही वाचाः मुंबई महापालिका सुधारणा विधेयक मंजूर; मुंबई, ठाण्याची निवडणूक लांबणीवर?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -