घरदेश-विदेशRBI गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

Subscribe

अर्थिक मुद्यांवर मोदी सरकार आणि वृत्तमंत्र्यांशी दुमत ठेवणारे RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांनी अखेर राजीनामा दिला आहे. वैयक्तिक करणामुळे राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी पत्राद्वारे दिला आहे. खासगी कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात सांगितले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये गव्हर्नर पदावर काम करणे एक सम्मानाची गोष्ट होती. RBI च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल पटेल आणि मोदी सरकार यांच्यात दुमत होते. पटेल यांनी त्वरीत राजीनामा दिल्यामुळे आता सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बँकेच्या विलिनीकरणावर ही उचलला होता प्रश्न

मोदी सरकारने देशातील बँकांसबधीत घेतलेल्या निर्णयाचा उर्जित पटेल यांना विरोध केला होता. दोन मोठ्या बँकेचे विलिनीकरण एका छोट्या बँकेशी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. मात्र देशातील सर्व मोठ्या बँका एकत्र आणून देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्याचे मत पटेल यांनी मांडले होते. याचबरोबर अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही  अर्थव्यवस्थेबद्दल घेतलेल्या निर्णयांबद्दल पटेल यांनी विरोध दर्शवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -