घरमहाराष्ट्रपोलीस अधिकाऱ्याने आमदारांना सुनावले!

पोलीस अधिकाऱ्याने आमदारांना सुनावले!

Subscribe

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सोमवारी महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आपली सत्ता टिकून राहावी, या निमित्ताने सत्ताधारी गटाचे नेते हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील महापालिकेच्या मुख्यालयाजवळ आले होते. यावेळी महापालिकेत प्रवेशावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव आणि लोकप्रतिनिधी यांच्यात बाचाबाची झाली.

शिस्तप्रिय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात नेहमी वादविवाद होत असतात. परंतू, या वादानंतरही न डगमगता काही अधिकारी आपले काम प्रामाणिकपणे आणि चोखपणे पार पाडतात. त्यामुळे हे अधिकारी लोकप्रिय ठरतात. सनदी अधिकारी तुकाराम मुंडे हे त्याचेच एक उदाहरण. आज कोल्हापूरच्या महापालिकेच्या प्रवेश द्वारावर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात झालेल्या बाचाबाचीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना दिलेल्या रोखठोक उत्तरामुळे राज्यभरातून सुरज गुरव यांचे कौतुक केले जात आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सोमवारी महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आपली सत्ता टिकून राहावी, या निमित्ताने सत्ताधारी गटाचे नेते हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील महापालिकेच्या मुख्यालयाजवळ आले होते. परंतु, महापालिकेत नगरसेवक वगळता इतरांना प्रवेश नव्हता. त्यामुळे बंदोबस्तीला असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना महापालिकेत प्रवेशासाठी अडवले. त्यांना आतमध्ये जाऊ दिले नाही. यावेळी मुश्रीफ यांनी विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी सुरज गुरव यांनी मुश्रीम यांना रोखठोक उत्तर दिले.

- Advertisement -

काय म्हणाले सुरज गुरव?

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव म्हणाले की, एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जाण्याची तयारी करतो. पण भीती घालू नका. साहेब, आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. आम्हाला राजकारण करायचे नाही. कुणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही. साहेब, आपण घरी जावे, असे सुरज गुरव यांनी ठणकावून सांगितले.

- Advertisement -

चहापेक्षा किटली गरमी – हसन मुश्रीम

या घटनेवर पत्रकार परिषदेत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, मी जेव्हा महापालिकेच्या प्रवेश द्वारावर गेलो, तेव्हा तिथे महापालिकेचे अधिकारी ओळखपत्र बघून आतमध्ये सोडत होते. मी जेव्हा आतमध्ये जाण्याच्या प्रयत्न केला तेव्हा एक पोलीस अधिकारी अडवा आला आणि नंतर जोरजोरात आरडाओरड करायला लागला. माझी बदली करा, असे जोरजोरात ओरडायला लागला. या सगळ्या घटनेला भाजप सरकार जबाबदार आहे. त्यामुळे चहापेक्षा किटली गरम म्हटल्या सारखा हा प्रकार आहे. या अधिकाऱ्याच्या विरोधात आपण विधानसभेमध्ये हक्कभंगाचा ठराव आणणार असल्याचे ते म्हणाले.


हेही वाचा – कोल्हापूर मनपाच्या महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरिता मोरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -