घरदेश-विदेशVeer Savarkar International Airport : नव्या टर्मिनलचं उद्या पंतप्रधान करणार उद्घाटन; इतक्या...

Veer Savarkar International Airport : नव्या टर्मिनलचं उद्या पंतप्रधान करणार उद्घाटन; इतक्या कोटींचा झाला खर्च

Subscribe

Veer Savarkar International Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या (18 जुलै) पोर्ट ब्लेअरमधील (Port Blair) वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Veer Savarkar International Airport) नवीन टर्मिनल इमारतीचे (New Terminal Building) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) मंगळवारी सकाळी 9 वाजता विमानतळावर पोहोचतील, त्यानंतर 90 मिनिटांनी पंतप्रधान मोदी टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. (Veer Savarkar International Airport Prime Minister will inaugurate the new terminal tomorrow So many crores have been spent)

हेही वाचा – Seema Haider : पाकिस्तानात दरोडेखोरांकडून हिंदू मंदिरावर रॉकेट हल्ला; सीमा हैदरशी आहे कनेक्शन?

- Advertisement -

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी मंगळवारी अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचं डिजिटल पद्धतीने उद्घाटन करतील. सुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन ऍप्रनमुळे इमारतीमुळे अंदमान आणि निकोबारमधील कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. नवीन टर्मिनल इमारतीच्या बांधकामामुळे केंद्रशासित प्रदेशाच्या संपर्काला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. टर्मिनलची वास्तुशिल्प रचना समुद्र आणि बेटांचे चित्रण करणाऱ्या शंख-आकाराच्या संरचनेसारखी आहे.

- Advertisement -

विमानतळामुळे अंदमान निकोबर येथील अर्थव्यवस्था बळकट होईल

अंदमान निकोबार बेटावर बांधण्यात येणारे पोर्ट ब्लेअर टर्मिनल बेट केंद्रशासित प्रदेशावर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगारच्या नव्या संधीही निर्माण होतील. या प्रकल्पात एकूण 40,800 चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम केले जाणार आहे. नवीन टर्मिनल इमारतीतून दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष प्रवाशांना सुविधा पुरवली जाईल. त्यामुळे नवीन टर्मिनल सुरु झाल्यानंतर अंदमान आणि निकोबारमधील पर्यटनाला गती  मिळणार असल्यामुळे तेथील अर्थव्यवस्थाही बळकट होईल.

हेही वाचा – Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सर्व 11 जागा बिनविरोध, TMCचे 6 आणि भाजपचे 5 उमेदवार

नवीन टर्मिनल इमारतीत ‘या’ सोयीसुविधा

पोर्ट ब्लेअर विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग-767-400 आणि दोन एअरबस-321 प्रकारच्या विमानांसाठी योग्य एप्रनही बांधण्यात आले आहे. त्यामुळे या विमानतळ आता एकावेळी 10 विमाने पार्क करता येणार आहेत. याशिवाय नवीन टर्मिनल इमारतीमध्ये छतावरील स्कायलाइट्सद्वारे 12 तास 100 टक्के नैसर्गिक प्रकाश असेल. तसेच इमारतीत 28 चेक-इन काउंटर, तीन पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज आणि चार कन्व्हेयर बेल्टसह सुसज्ज असणार आहेत.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -