घरदेश-विदेशचंद्रावर 'विक्रम'चे हार्ड लँडिंग झाल्याचे फोटो 'नासा'कडून प्रसिद्ध

चंद्रावर ‘विक्रम’चे हार्ड लँडिंग झाल्याचे फोटो ‘नासा’कडून प्रसिद्ध

Subscribe

नासाचे ऑर्बिटर पुन्हा एकदा लँडिंग ठिकाणाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणार असून १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा फोटो काढण्याचा प्रयत्न केले जाणार आहे.

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने कोट्यांवधी भारतीयांसह इस्त्रोची देखील निराशा झाली. त्यानंतर देखील विक्रमशी संपर्क साधला जाईल अशी आशा होती. मात्र विक्रमशी पुन्हा संपर्क साधणे शक्य नसल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या तपासावरून समोर आले आहे.

‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील विक्रम लँडरची फोटो प्रसिद्ध केली आहेत. ‘विक्रम’ लँडर चंद्रावर उतरताना त्याचे हार्ड लँडिंग झाले म्हणजेच ते जोरात आदळले असल्याचे नासाने या फोटोंच्या आधारे स्पष्ट केले आहे. नासाने प्रसिद्ध केलेली हे हाय रेझॉल्यूशन फोटो ऑर्बिटरद्वारे घेण्यात आले आहेत.

- Advertisement -

अशी घडली होती घटना

विक्रम लँडरने चंद्रावरील एका सपाट भूमीवर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विक्रमचे हे उतरणे अपेक्षेनुसार झाले शकले नाही. या नंतर ७ सप्टेंबरला विक्रमचा इस्रोशी असलेला संपर्क तुटला. विक्रम चंद्रावर उतरताना त्याचे हार्ड लँडिंग झाले म्हणजेच ते जोराने आदळले हे स्पष्ट झाल्याचे नासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. विक्रम नेमक्या कोणत्या जागी आदळले हे अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही. हे सर्व फोटो १५० किमी अंतरावरून काढण्यात आल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

विक्रमला ७ सप्टेंबरला चंद्रावर उतरायचे होते. चंद्रावर उतरण्याचा भारताचा हा पहिलाच प्रयत्न होता. नासाचे ऑर्बिटर विक्रम ज्या ठिकाणी उतरले त्या जागेवरून १७ सप्टेंबर या दिवशी गेले होते. त्याच दिवशी हे हाय रेझॉल्यूशन असलेले फोटो काढण्यात आल्याचे नासाने म्हटले आहे. मात्र, या ऑर्बिटरच्या टीमला फोटो आणि लँडरचे ठिकाण कोणते आहे. हे ओळखता आले नाही. नासाचे ऑर्बिटर पुन्हा एकदा लँडिंग ठिकाणाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच १४ ऑक्टोबर रोजी प्रकाशाची स्थिती चांगली असल्याने पुन्हा एकदा फोटो काढण्याचा प्रयत्न केले जाणार आहे.


हेही वाचा – Live Update: शरद पवार यांचा ‘ईडी’ दौरा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -