घरदेश-विदेशदेशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे - नरेंद्र मोदी

देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे – नरेंद्र मोदी

Subscribe

''आपला शत्रू आपल्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. या देशाची प्रगती थांबावी, यासाठी ते प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपण सर्व देशवासीयांनी एकजुटीने उभे राहण्याची शक्यता आहे.''

बालकोट येथे भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आपला शत्रू आपल्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

- Advertisement -

सेनेच्या सामर्थ्यावर विश्वास

देशाची भावना सध्या वेगळ्या पातळीवर आहे. देशाचे वीर जवान सीमेवर पराक्रम दाखवत आहेत. आज संपूर्ण देश एकजुटीने आपल्या जवानांसोबत उभे आहेत. संपूर्ण जग आमची ऐकी बघत आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

देशवासीयांनी एकजुटीने राहवे 

यावेळी पाकिस्तानच्या नावाचा कोणताही उल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. ”आपला शत्रू आपल्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. या देशाची प्रगती थांबावी, यासाठी ते प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपण सर्व देशवासीयांनी एकजुटीने उभे राहण्याची शक्यता आहे.” असे देखील मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मोदींनी 56 इंचाची छाती दाखवली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -