घरदेश-विदेश'वेगळे झालो म्हणून काय झाले, मैत्री कायम राहणार'; भाजपबद्दल INDIA आघाडीतील नत्याचे वक्तव्य!

‘वेगळे झालो म्हणून काय झाले, मैत्री कायम राहणार’; भाजपबद्दल INDIA आघाडीतील नत्याचे वक्तव्य!

Subscribe

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजप बद्दल मोठे वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी सेंट्रल युनिवर्सिटीच्या दीक्षांत समारोहात भाषण करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

पाटणा : भाजपला 2024 मध्ये टक्कर देण्यासाठी देशातील 28 पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उघडली आहे. या आघाडीच्या आतापर्यंत देशात तीन महत्वपूर्ण बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमध्ये मोदी हटावचा नारा देण्यात आलेला होता. ही मोट बांधण्याचे धाडस केले होते ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी. परंतू आता त्यांनी भाजपबद्दल केलेले वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावणारे असून, यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे. (What happened as parted friendship will last The speech of the leader of INDIA about BJP!)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजप बद्दल मोठे वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी सेंट्रल युनिवर्सिटीच्या दीक्षांत समारोहात भाषण करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, भाजपसोबत त्यांची मैत्री जोपर्यंत तुटणार नाही की जोपर्यंत आपण मरणार नाही. एवढेच नव्हे तर आपण वेगळे झालो तरी काय झाले मैत्री मात्र कायम राहणार असेही त्यांनी याच दीक्षांत समारंभात म्हटले. यावेळी उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तर यावेळी त्यांनी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरही टीका केली.

- Advertisement -

गुरुवारी (19 ऑक्टोबर) महात्मा गांधी यांची कर्मभूमी पूर्वी चंपारणच्या मोतीहारीमध्ये असलेल्या महात्मा गांधी केंद्रीय विश्वविद्यालयचा दीक्षांत समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार, मोतीहारीचे खासदार राधामोहन सिंह यांच्यासह असंख्य नेते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार का? नारायण राणेंचा शरद पवारांना सवाल

- Advertisement -

भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून केले वक्तव्य

दीक्षांत समारंभाला उपस्थित विदयार्थी-विद्यार्थिनी आणि इतर प्रमुख पाहुण्यांना संबोधित करताना नितीश कुमार यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी समारंभाला भाजपचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. त्यांना उद्देशून नितीश कुमार म्हणाले की, जेवढे आमचे लोक येथे हजर आहेत ते आमचे सगळे साथी आहेत. सोडा ना की आम्ही वेगळे आहोत. तुम्ही वेगळे आहात म्हणून काय झाले, परंतू आपली मैत्री थोडी तुटली. जोपर्यंत आपण जीवंत असू तोपर्यंत आपली मैत्री कायम राहणार. चिंता करू नका, आम्ही आतापर्यंत तुमच्यासोबत होतोय, आता यापुढेही आम्ही तुमच्यासोबतच राहणार असेही वक्तव्य नितीश कुमार यांनी केले.

हेही वाचा : Lalit Patil Drugs case : दीड वर्षात ‘ससून’चे बदलले सहा अधीक्षक! ललित पाटीलच्या पडले…

मनमोहन सिंग सरकारवर केली टीका

दीक्षांत समारंभात भाजपचे गोडवे गात असताना नितीश कुमार यांनी तत्कालीन कॉंग्रेसचे मनमोहन सिंग सरकावर टीका केली. ते म्हणाले की, 2006-2007 आम्ही तत्कालीन सरकारकडे महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीवर केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी आमची मागणी ऐकून घेण्यात आली नाही. मात्र, जेव्हा 2014 मध्ये नवे सरकार आले तेव्हा आम्ही भाजप सरकारकडे तीच मागणी केली तेव्हा सरकारने आमचे म्हणणे ऐकून घेत आमची मागणी पूर्ण केली. मुख्यमंत्री नितीश कुमार हे जेव्हा बोलत होते तेव्हा मंचावर राष्ट्रपती आणि राधा मोहन सिंहसुद्धा उपस्थित होते. नितीश कुमार यांच्या वक्तव्यामुळे मात्र, बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -