घरताज्या घडामोडीWHO : अर्भक, नवजात बालकांचे मृत्यू रोखा, लस निर्मितीची जागतिक आरोग्य संघटनेची...

WHO : अर्भक, नवजात बालकांचे मृत्यू रोखा, लस निर्मितीची जागतिक आरोग्य संघटनेची मागणी

Subscribe

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने बुधवारी एक महत्वाच्या विषयाच्या निमित्ताने आवाहन केले आहे. जिवाणूंपासून होणारा संसर्ग (bacterial infection) मुळे प्रत्येक वर्षी होणारे दीड लाख मृत्यू रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने लस निर्मितीचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्राची आरोग्य संघटना आणि लंडन स्कुल ऑफ हायजिन एण्ड ट्रॉपिकल मेडिसिनने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार गर्भाशयातच होणारे मृत्यू आणि अर्भकांचे होणारे मृत्यू यासाठी जिवाणूंपासूनचा संसर्ग कारणीभूत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या अहवालातील नोंदीनुसार ग्रुप बी स्ट्रेप्टोकॉकस संसर्गामुळेच हे मृत्यू होत असल्याची माहिती आहे. मातेच्या गर्भातच या संसर्गाची लागण होते. तसेच या संसर्गामुळे अपंगत्वही येत असल्याचे समोर आले आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार २०१७ मध्ये जवळपास १ लाख नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. तर ५० हजार मृत्यू हे गर्भाशयातच होत असल्याचे आढळले आहे. पण खरी आकडेवारी यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. आकडेवारीतील त्रुटींमुळेच ही आकडेवारी अधिक असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पहिल्यांदाच गर्भाशयातील मृत्यू, कमी वाढीमुळे झालेले मृत्यू याबाबतची माहिती गोळा करण्यात आली. दीर्घ कालावधीसाठी येणारे अपंगत्वासाठीही हा संसर्ग कारणीभूत आहे. या आकडेवारीला अनुसरून लस निर्मितीचेही आवाहनही या अहवालातून करण्यात आले आहे. नवीन मुलांच्या जन्माबाबत आणि आरोग्याच्या बाबतीत हा संसर्ग मोठा धोका म्हणून समोर आला आहे. तसेच जगभरातील कुटूंबांवर या संसर्गाचा परिणाम होत असल्याचे असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.

त्यामुळेच डब्ल्यूएचओ (WHO) ने तातडीने मॅटरनल जीबीएस लस तयार करण्याची मागणी केली आहे. जगभरातील देशांमध्ये ही लस परिणामकारक ठरू शकते. मॅटरनल लसीकरणामुळेच आगामी कालावधीत मोठ्या प्रमाणात नव्या मुलांचे जीव वाचवले जावू शकतात. या लसीची संकल्पना ही तीस वर्षांपूर्वीच मांडण्यात आली होती. सरासरी १५ टक्के गरोदर महिला म्हणजे वर्षापोटी २ कोटी महिलांना त्यांच्या योनीत जीबीएस संसर्ग होतो. पण अनेक प्रकरणात संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. या संसर्गाने बाधित महिला ही नवजात बालकालाही हा संसर्ग फैलावू शकते. नवजात बालकामध्ये संसर्गाशी इम्युनिटी नसल्यानेच मोठ्या प्रमाणातील जिवाणूविरोधात लढण्याची क्षमता या बालकांमध्ये आढळत नाही. हा संसर्ग जीवघेणा असा आहे. त्यामुळे मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी, दृष्टी गमावणे किंवा एेकण्याची समस्याही निर्माण होऊ शकते.

- Advertisement -

मॅटरनल जीबीएस आफ्रिका, पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियात आढळले आहे. हा संसर्ग सततच्या चाचण्यांमधून तसेच नियमित तपासणीतून आढळून येतो. वर्षापोटी ५० हजार नवजाच अर्भकांचे आणि नवजात बालकांचे मृत्यू या संसर्गामुळे होतात. म्हणूनच लसीची मागणी आता जोर धरत आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -