घरदेश-विदेशतामिळनाडू येथे पिसाळलेला हत्ती जेरबंद!

तामिळनाडू येथे पिसाळलेला हत्ती जेरबंद!

Subscribe

तामिळनाडू येथे पिसाळलेल्या हत्तीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

तामिळनाडू येथे हैदोस घातलेल्या पिसाळलेल्या जंगली हत्तीला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. हा हत्ती जंगलामध्ये हैदोस घालत होता. या हत्तीने आतापर्यंत चार जणांना चिरडून त्यांचा बळी घेतला. तसेच हा हत्तीने मोठ्या प्रमाणात पिकांची देखील नासधूस केली होती. या हत्तीची तामिळनाडू मधील कोइंबतुर या भागात प्रचंड प्रमाणात दहशत वाढली होती. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले होते आणि एकच खळबळ उडाली होती. मात्र अखेर या हत्तीला जेरबंद करण्यात वनविभाला यश आले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

तामिळनाडू मधील कोइंबतुर या भागात एक पिसाळलेला हत्ती या भागात मोठ्या प्रमाणात हैदोस घालत होता. त्यांनी अनेक नागरिकांना जखमी देखील केले होते. त्याची संपूर्ण भागात मोठी दहशत होती. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. या हत्तीला पकडण्यासाठी वनविभाग खूप दिवसांपासून त्याच्या पातळीवर होते. परंतु तो हाती लागत नव्हता. मात्र अखेर मंगळवारी या हत्तीला पकडण्यात वनविभाग कर्मचाऱ्याला यश आले आहे. या हत्तीची रवानगी जेलमध्ये केली असून त्याला मुदुमलाई वन्यजीव अभयारण्यात सुखरुपणे सोडण्यात आल्याचे येथील वनविभागचे अधिकारी दीपक श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.


वाचा – कोंबड्याच्या खुराड्यात शिरला बिबट्या; वनविभागाने केले जेरबंद

- Advertisement -

वाचा – जुन्नरमधील ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -