घरदेश-विदेशमृत आईला प्रॉपर्टीसाठी ७ वर्षे दाखवले जिवंत

मृत आईला प्रॉपर्टीसाठी ७ वर्षे दाखवले जिवंत

Subscribe

नोएडा सेक्टर २० च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरजपूर जिल्ह्यातील कोर्टात मेणबत्ती कंपनी चालवणाऱ्या विजय गुप्ता यांनी त्यांचा भाऊ सुनिल गुप्ता विरोधात तक्रार दाखल केली होती

प्रॉपर्टीची हाव सख्ख्या नात्यांनाही विसरायला भाग पाडते. आणि त्यासाठी काहीही करायला लावते. २८५ कोटींची प्रॉपर्टी बळकावण्यासाठी एका मुलाने चक्क मृत आईला जिवंत दाखवले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी या प्रकरणाशी संबधित तिघांना ताब्यात घेतले. नोएडा पोलिसांनी ही कारवाई केली असून सोमवारी त्यांना मुंबईहून अटक करण्यात आली आहे.

वाचा- सावधान! गृहउद्योगाच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक

नेमकं प्रकरण काय?

नोएडा सेक्टर २० च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरजपूर जिल्ह्यातील कोर्टात मेणबत्ती कंपनी चालवणाऱ्या विजय गुप्ता यांनी त्यांचा भाऊ सुनिल गुप्ता विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये भावाने आईच्या मृत्यूबद्दल खोटी माहिती देऊन सगळी संपत्ती स्वत:च्या नावावर करुन घेतली असा आरोप केला होता. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला. या तपासाअंती सुनिल गुप्ता यांनी खोटे कागदपत्र सादर केल्याचे समोर आले. त्यामुळेच पोलिसांनी त्यांचा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलाला अटक केली.

- Advertisement -
हे देखील वाचा- फ्लॅटचे आमिष दाखवून 98 लाख रुपयांची फसवणूक

७ वर्षांपूर्वी आईचा मृत्यू

पोलिसांनी केलेल्या तपासात गुप्ता यांचा मृत्यू ७ मार्च २०११ रोजी झाला होता. पण केवळ सगळी प्रॉपर्टी स्वत:ला मिळावी म्हणून त्यांनी आईच्या मृत्यूची खोटी कागदपत्रे तयार केली. शिवाय भावाला प्रॉपर्टीमधील काही मिळू नये यासाठी आईनेच सगळी प्रॉपर्टी माझ्या नावे केली असा बनाव रचला. पण भावाला हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने या संदर्भात तक्रार केली. सुनिल गुप्ताला ही सगळी फसवणूक करण्यासाठी आणखी तिघांनी मदत केली होती.त्यांच्या मुसक्या देखील पोलिसांनी आवळल्या आहेत. या सगळ्यांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -