घरदेश-विदेशऐकावं ते नवलच; विषारी नागांपासून तयार होतेय वाईन

ऐकावं ते नवलच; विषारी नागांपासून तयार होतेय वाईन

Subscribe

चीनसह व्हियतनाममध्ये विषारी नागांपासून वाईन तयार करण्याची परंपरा

विषारी साप म्हटलं की कोणत्याही माणसाला भिती वाटणार हे सहाजिक आहे. मात्र अशाच काहिशा विषारी सापांपासून वाईन तयार केली जात आहे, हे सांगितले तर तुम्हाला खरं वाटणार नाही. मात्र यावर विश्वास बसणार नसला तरी हे खरं आहे. चीनसह व्हियतनाममध्ये विषारी नागांपासून वाईन तयार केली जाते आणि ही तेथील परंपराच आहे.

- Advertisement -

या विषारी असणाऱ्य़ा नागांपासून वाईन तयार केली जाते आणि आजही जे मद्यप्राशन करणारे मद्यपी किंवा मद्य शौकीन खासकरून ही वाईन पिण्यास चीन तसेच व्हिएतनामला भेट देतात. ही स्नेक वाईन तयार करण्यास सापांच किंवा नागांचे विष आणि रक्त वाईनमध्ये मिक्स केले जाते, मात्र हे विषारी सापांचे रक्त आणि विष वाईनमधून पिल्याने या विषाचा कोणातीही दुष्परिणाम होत नसल्याने अनेक मद्यशौकीन स्नेक वाईनचा आनंद घेत असतात.

चीनमध्ये दहाव्या शतकात स्नेक वाईन तयार करण्याचे सांगितले जात असून स्नेक वाईनची तीव्रता इतर वाईनपेक्षा अधिक असते. मात्र वाईन तरूणांनी खूप जास्त प्रमाणात पिणं धोक्याचे मानले जाते.

स्नेकवाईन जास्त पिणे धोक्याचे

  • अतिसेवनानं तरूणांना पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता
  • प्रसंगी नपुंसकताही येऊ शकते
  • स्नेक वाईनची तीव्रता इतर वाईनपेक्षा अधिक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -